पुढील आठवड्यात स्मार्टफोन प्रेमींसाठी Poco M7 Plus 5G आणि Oppo K13 सिरीज लाँच केले जाणार आहेत. जर तुम्हाला तुमचा जुना फोन अपग्रेड करायचा असेल, तर आजच्या लेखात आपण या तीन स्मार्टफोन बद्दल जाणून घेऊयात की कोणता नवीन स्मार्टफोन कोणत्या दिवशी लाँच होणार आहे. तसेच यामध्ये कोणते खास फिचर्स आहेत? तसेच हे आगामी स्मार्टफोन अधिकृत लाँच झाल्या नंतर फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
POCO M7 Plus 5G: लाँच तारीख आणि फीचर्सपुढील आठवड्यात POCO M7 Plus 5G हा स्मार्टफोन 13 ऑगस्ट 2025 रोजी लाँच केला जाईल, लाँच झाल्यानंतर हा फोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. कंफर्म केलेल्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन 7000 mAh बॅटरीसह येईल आणि हे लक्षात घेण्यासारखे आहे की 7000 एमएएच असूनही हा फोन सिलिकॉन कार्बन तंत्रज्ञानामुळे या श्रेणीतील सर्वात पातळ स्मार्टफोन आहे. यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढविण्यास तसेच पॉवर बॅटरीला स्लिम डिझाइनमध्ये बसविण्यास मदत करते. रिव्हर्स चार्जिंग तंत्रज्ञान असलेल्या या फोनमध्ये 6.9-इंचाचा डिस्प्ले असेल जो 144 हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो.
POCO M7 Plus 5G ची किंमतफ्लिपकार्टवर या आगामी स्मार्टफोनसाठी एक वेगळे पेज तयार करण्यात आले आहे, ज्यावरून किंमतीबद्दल एक मोठा संकेत देण्यात आला आहे, कंपनीकडून सांगण्यात आले आहे की हा फोन ग्राहकांसाठी 15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच केला जाईल.
OPPO K13 सिरीज: स्पेसिफिकेशन्स आणि लाँच तारीखओप्पोची ही नवीन सिरीज पुढील आठवड्यात 11 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजता लाँच केली जाईल, या सिरीजमध्ये OPPO K13 टर्बो आणि K13 टर्बो प्रो लाँच केले जाऊ शकतात. फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्ये अॅक्टिव्ह कूलिंग फॅन, स्नॅपड्रॅगन 8एस जनरेशन 4 प्रोसेसर, 7000एमएएच बॅटरी, बेस्ट इन क्लास पॅसिव्ह कूलिंग, 80 वॅट फास्ट चार्ज, 1600 निट्स पीक ब्राइटनेस, 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, 1.5 के अल्ट्रा एचडी रिझोल्यूशन, 50 मेगापिक्सेल अल्ट्रा क्लियर कॅमेरा सिस्टम आणि एआय एडिटर 2.0 सारखी फिचर्स आहेत.