पारगाव, ता. ८: विश्रांतवाडी (पुणे) येथील स्थायिक असणारे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रादेशिक संचालक महेश धर्माधिकारी (वय ५७) यांचे चेन्नई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. दिल्ली, अजमेर, पटना, भुवनेश्वर, पुणे, त्रिवेंद्रम ,चेन्नई येथे त्यांचा सेवा कार्यकाल गेला. त्यांना गायनाची आवड होती.