रक्षेचं बंधन: एक प्रेमाचा धागा, जो विश्वास जपतो
GH News August 09, 2025 09:14 PM

भारताच्या महामार्गांवर, न बोलता तयार होतात विश्वासाचे बंध. भारताचे ट्रक चालक दिवसरात्र मेहनत करून, झोप न घेता, अंतहीन रस्त्यांवरून देशाचा श्वास चालू ठेवतात. या रक्षाबंधनाला, Tata Motors Commercial Vehicles आणि TV9 नेटवर्क एकत्र येऊन त्यांच्या अतुलनीय मेहनतीला सलाम करत आहेत एका हृदयस्पर्शी उपक्रमाद्वारे:

“रक्षेचं बंधन – टाटा ट्रक्स, देशाचे ट्रक्स.”

Tata च्या प्रसिद्ध जमशेदपूर प्लँटमध्ये, दुर्गा लाईनमधील महिलांनी त्यांचे दररोजचे सुरक्षित आणि दर्जेदार Tata ट्रक तयार करण्याचे काम थांबवून काहीतरी खास बनवले—स्वहस्ते बनवलेल्या राख्या. या राख्या केवळ सणाचे चिन्ह नव्हत्या. प्रत्येक राखीमध्ये एक खास संदेश होता—हाताने लिहिलेला, अशा ट्रक सारथ्यांसाठी जे त्यांना कधीच भेटले नाहीत, पण ज्यांच्याबद्दल त्यांना कायमच जिव्हाळा वाटतो.

या उपक्रमामधून, त्या महिलांनी हे दाखवून दिलं की, संरक्षण केवळ क्रॅश-टेस्टेड Ultra, Signa आणि Prima Tata Trucks किंवा Engine Brakes, Hill Start Assist यांसारख्या आधुनिक सुरक्षाविषयक फीचर्सपुरते मर्यादित नाही—कधी कधी ते असतं अशा लहानशा हळव्या कृतींमध्ये, न सांगता तयार होणाऱ्या नात्यांमध्ये आणि ट्रक बनवणाऱ्यांच्या व चालवणाऱ्यांच्या सामायिक अभिमानात.

या रक्षाबंधनाला, Tata Motors हे सुंदर नातं साजरं करत आहे—ज्यांमध्ये ट्रक तयार करणाऱ्या हातांचा आणि भारत चालवणाऱ्या ट्रक सारथ्यांचा संगम आहे.

Tata Motors Commercial Vehicles – नेहमीच उत्तम.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.