Uric Acid: अनेकदा लोक सांध्यात हलके दुखणे किंवा सूज आली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करत असतो. परंतू हे दुखणं तुमच्या शरीरात हाय युरिक एसिड पातळीचे संकेत असू शकतात. वेळीच या लक्षणांना ओळखावे.कारण पुढे जाऊन संधीवात सारखा आजार तुम्हाला होऊ शकतो. डॉक्टरांच्या मते युरिक एसिडटी पातळी वाढल्यास ते क्रिस्टलच्या रुपात जमू लागतात. आणि त्यामुळे सुज येते आणि शरीराचा दुखरा भाग लालसर होऊन तीव्र वेदना होतात.
याच्या अंगठ्यात तीव्र दुखणे – हे सर्वसामान्य लक्षण आहे. दुखणे अचानक सुरु होते आणि रात्रीचे हे दुखणे अधिक असते.
गुडघे आणि घोट्यांमध्ये सूज – सुज येऊन गरम होणे आणि दाब पडल्याने दुखणे वाढू शकते
हाताची बोटे आखडणे – खासकरुन सकाळी काम करताना हाताने काही काम करताना त्रास होतो
टाचेमध्ये दुखणे – चालताना आणि उभे रहाताना त्रास होतो
जास्त प्रमाणात रेड मीट आणि सीफूडचे सेवन
साखर,गोड पदार्थांचे प्रमाण जास्त
मद्य आणि बिअरचे जास्त प्रमाण
लठ्ठपणा आणि कमी सक्रीय असणे
किडनीच्या समस्येमुळे युरिक एसिड योग्य प्रकारे शरीराबाहेर न पडणे
जर तुम्हाला वारंवार या भागात दुखत असेल, सूज आणि लालसरपणा जाणवत असेल लागलीच रक्त तपासणी करावी. खूप काळ दुर्लक्ष केले तर क्रॉनिक संधीवात, किडनी स्टोन आणि किडनी डॅमेज होण्यापर्यंत हे जाऊ शकते.
रोज किमान ८ ते १० ग्लास पाणी प्या
मटण, मद्य आणि साखरेचे ड्रीक्स टाळा
ताजी फळे,हिरव्या भाज्या डाएटमध्ये सामील करा
नियमित एक्सरसाईज करा, वजन नियंत्रिक राखा
लो-फॅट डेअरी प्रोडक्ट्सचे सेवन करावे
शरीराच्या कोणत्याही भागात सतत दुखत असेल तर दुर्लक्ष करु नका. खास करुन सांध्यात दुखत असेल. हाय युरिक एसिड जर वाढले असले तर वेळीच त्याचा शोध लावून त्यावर उपचार केल्यास सांध्यांचे आयुष्य वाढू शकते.
( Disclaimer: यातील माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या सल्ला अंमलात आणण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा )