भारताने इंग्लंडमध्ये खेळलेल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेत जबरदस्त कामगिरी केली. भारताने ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. या मालिकेनंतर भारतीय संघ मायदेशी परतला असून आशिया कप आणि देशांतर्गत स्पर्धेसाठी तयारी सुरु केली आहे. आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिग्गज खेळाडू घाम गाळणार आहेत. असं असताना साई सुदर्शनला मात्र फटका बसला आहे. इंग्लंडमध्ये तीन सामन्यात 23.33 च्या सरासरीने त्याने 140 धावा केल्या होत्या. यात त्याने 61 धावांची सर्वोत्तम खेळी केली. मात्र भारतात परतल्यानंतर साई सुदर्शनला संघातून डावललं आहे. क्रीडाप्रेमींना असं काही झालं यावर विश्वास बसत नाही. पण तसंच झालं आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी संघांची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी साऊथ झोनने संघ जाहीर केला आहे. या संघाचं नेतृत्व तिलक वर्माकडे असेल. पण या संघातून साई सुदर्शनला डावलण्यात आलं आहे.
बुचि बाबू इन्विटेशनल स्पर्धेसाठीही तामिळनाडू क्रिकेट संघाने दोन संघ जाहीर केले. मात्र त्यातही साई सुदर्शनचं नाव नाही. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने टीएनसीए 11 आणि टीएनसीए प्रसिडेंट 11 टीम जाहीर केली आहे. या दोन्ही संघात साई सुदर्शनला स्थान मिळालेलं नाही. साई सुदर्शनने आयपीएल 2025 स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने या स्पर्धेत 51.21 च्या सरासरीने 156.17 च्या स्ट्राईक रेटने 759 धावा केल्या होत्या. त्याला ऑरेंज कॅपही मिळाली होती. या कामगिरीच्या जोरावर त्याला कसोटी संघात स्थान मिळालं होतं. पण आता देशांतर्गत स्पर्धेतून डावललं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना धक्का बसला आहे. टीएनसीए प्रसिडेंट 11 साई किशोर, तर टीएनसीए 11 कर्णधारपद प्रदोष रंजन पॉलकडे सोपवण्यात आलं आहे. तर उपकर्णधारपद बूपति वैष्ण कुमारकडे सोपवलं आहे.
टीएनसीए 11: आर. साई किशोर (कर्णधार), सी. आंद्रे सिद्दार्थ सी (उपकर्णधार), बी. इंद्रजीत, विजय शंकर, एम. शाहरुख खान, आर. विमल खुमार, एस. राधाकृष्णन, एस. लोकेश्वर, जी. अजितेश, जे. हेमचुदेशन, एम. सिद्धार्थ, आर.एस. अंबरीश, सी.वी. अच्युत, एच. त्रिलोक नाग, पी. सरवण कुमार आणि के. अभिनव
टीएनसीए प्रेसिडेंट 11: प्रदोष रंजन पॉल (कर्णधार), बूपति वैष्ण कुमार (उपकर्णधार), बी. सचिन, तुषार रहेजा, किरण कार्तिकेयन, एस. मोहम्मद अली, एस. रितिक ईश्वरन, एस.आर. आतिश, एस. लक्ष्य जैन, डी.टी. चन्द्रशेखर, पी. विद्युत्, आर. सोनू यादव, डी. दीपेश, जे. प्रेम कुमार, ए. एसाक्कीमुथु आणि टी.डी. लोकेश राज.