Chh. Sambhajinagar: जीएसटी नोंदणीचा गैरवापर करून कर सल्लागारानेच लुटले ७४ लाख; जवाहरनगर पोलिसांत गुन्हा
esakal August 10, 2025 05:45 AM

छत्रपती संभाजीनगर : नोंदणीकृत जीएसटी क्रमांकाचा गैरवापर करून कर सल्लागारानेच विश्वासघात केल्याचा प्रकार समोर आला. यात तब्बल ७४ लाखांचा गैरव्यवहार झाला. २७ नोव्हेंबर २०२४ ते ३० जानेवारी २०२५ या कालावधीत जवाहर कॉलनी परिसरात ही घटना समोर आली. प्रकरणी जवाहरगनर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. गोविंद सत्यनारायण लाहोटी (रा. राजयोग प्राइड, विनायक पार्क, देवळाई रोड) असे गैरव्यवहार करणाऱ्या कर सल्लागाराचे नाव आहे.

या प्रकरणी मधुसूदन चतुर्भुज सोनी (वय ५१, रा. मोटे गल्ली, गेवराई, ता. गेवराई, जि. बीड) यांनी तक्रार दिली. सोनी यांचा गोळ्या, बिस्किटे आणि पान साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी त्यांच्या सर्व व्यवहारासंबंधी ऑगस्ट २०१७ ला जीएसटी नोंदणीसह लाहोटी यांना जबाबदारी दिली.

यात लाहोटीने सोनी यांचा मोबाइल क्रमांक किंवा ई-मेल न घेता स्वतःचा मोबाइल क्रमांक, ई-मेलचा वापर केला. यामुळे सोनी यांना कुठलीही माहिती मिळत नव्हती. याचाच फायदा घेत हा सर्व गैरव्यवहार झाल्याचे समोर आले.

हा प्रकार करताना ध्रुव ट्रेडिंग, एम.एम. ट्रेडिंग, ग्लोबल ट्रेडिंग ॲण्ड कंपनी यांसारख्या प्रत्यक्षात सोनी यांच्याशी संबंध नसलेल्या कंपन्यांचा वापर करून बनावट बिले तयार करण्यात आली. यात विशेष म्हणजे २०२३-२४ मध्ये तर १ लाख ३७ हजार ३४५ रुपये आयकर भरल्याचे समोर आले.

Bharat Mata Mandir: भारतमातेचे मंदिर नव्या रूपामध्ये; शंभरहून अधिक क्रांतिकारकांची सचित्र माहिती, २५ वर्षांत ३ लाख जणांची भेट आमच्या मागे फिरावे लागेल

गैरव्यवहारानंतर लाहोटीशी संपर्क केल्यानंतर ‘डिमांड निल करून देतो’ असे त्याने सांगितले. आता काहीतरी मार्ग निघेल असे वाटत असताना लाहोटीने मोबाइलच बंद केला. नंतर संपर्क केल्यावर पोलिस तक्रार केल्याने काही होणार नाही, आमच्या मागे फिरावे लागेल, असे सांगितले. दरम्यान, सोनी यांनी तक्रार दिल्याने गुन्हा नोंद झाला.

खरेदी व्यवहार

२०२३-२४ : ८३ लाख ८ हजार ८६९ रुपये (जीएसटी १६ लाख ४३ हजार ८४० रुपये)

२०२४-२५ : १ कोटी ३५ लाख ४२ हजार ४८८ (जीएसटी ३४ लाख ९२ हजार ४४०)

विक्री व्यवहार

२०२२-२३ : ९१ लाख ५५ हजार ३० रुपये (जीएसटी २१ लाख ७० हजार ३५५)

२०२३-२४ : १ कोटी ६७ लाख ३० हजार १७२ रुपये (जीएसटी ३८ लाख ७० हजार ९२७)

एकूण जीएसटी गैरव्यवहार : ७३ लाख ६३ हजार ३६७

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.