राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा भाऊ-बहिणींमधील प्रेमाचा, ते साजरं करण्याचा सण आहे. या दिवशी भावा-बहिणींमध्ये काही कटुता असली तरी ती विसरली जाते. जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो. पण बब्बर कुटुंबात सर्व काही ठीक नसल्याचे दिसते. विख्यात ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांची मुलगी जुही बब्बर सोनी हिने रक्षाबंधनच्या दिवशी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिचा सावत्र भाऊ प्रतीक बब्बर कुठेही दिसत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत होतं.
जुही बब्बर सोनीने इन्स्टाग्रामवर रक्षाबंधनाच्या सेलिब्रेशनचा एक फोटो शेअर केला. हसरे फोटो तर होते, मात्र त्यासोबत शेअर करण्यात आलेली तिची कॅप्शन अतिशय इमोशनल होती, त्यामध्ये तिने तिच्या आतल्या (मनातील) रिकामेपणाचा उल्लेख केला. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिने बरेच फोटो शेअर केले, परंतु त्यामध्ये तिचा सावत्र भाऊ, प्रतीक स्मिता पाटील कुठेच दिसला नाही. प्रतीक काही महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अ़कला, तेव्हा त्याने त्याच्या वडिलांना आणि बब्बर कुटुंबातील कोणालाही लग्नाला आमंत्रित केले नव्हते, आणि आता तो राखीच्या या उत्सवातही त्यांच्यासोबत सामील झाला नाही.
जुही बब्बरची पोस्ट काय ?
जुहीने आर्य बब्बरला राखी बांधनतानाचे तसेच रक्षाबंधनचे इतर काही फोटो टाकत एक कॅप्शनही लिहीली. – ‘ काही सेलिब्रेशन पूर्ण असतात.. तर काही अधुरी वाटतात. आज रक्षाबंधन आहे, आणि मनात आनंद तर आहे, पण माझ्या हृदयाचा एक भाग अजूनही गायब आहे. पण आयुष्य पुढे जातच असतं.. आणि रक्ताची नाती कोणी बदलू शकत नाही. खरं रक्त कायम (सोबत) राहतं’ असं तिने पोस्टसोबत लिहीलं.
View this post on Instagram
A post shared by JUHI BABBAR SONI (@juuhithesoniibabbar)
चाहत्यांच्या प्रतिक्रिया
तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्याचे लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. पण या सेलिब्रेशनमध्ये प्रतीकचं नसणं अनेकांना खटकलं. एका यूजरने लिहीलं, ‘मी तुमच्या कौटुंबिक बाबींवर भाष्य करणं योग्य नाही नाही, पण प्रतीक न दिसल्याने मला खूप वाईट वाटलं. त्यानेही यायला हवं होतं.’ तर दुसऱ्या चाहत्याने थेट प्रश्न विचारला, ‘प्रतीक आता भाऊ नाही का? तो या फोटोंमध्ये का नाहीये?’ ‘तुम्ही प्रतीक भैयाला आमंत्रित केले नाही का?’असंही आणखी एकाने कमेंट करत विचारलं.
एप्रिलपासून प्रतीकची दूरी
प्रतीक हा राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा आहे. स्मितापूर्वी राज यांचे लग्न नादिरा बब्बरशी झाले होते, त्यांच्यापासून त्यांना जुही आणि आर्या ही दोन मुले आहेत. पूर्वी प्रतीक त्याच्या सावत्र भावंडांसह एकत्र राहत होता, परंतु एप्रिल 2025 पासून ते वेगळे झाले आहेत. त्यानंतर जुहीने एक फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘राज बब्बरजींची तीन मुले… जुही, आर्या आणि प्रतीक. हे सत्य कोणीही बदलू शकत नाही.’
आता राखीच्या सेलिब्रेशनलाही प्रतीक न आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.