स्ट्रेस येतोय, झोप उडालीय? पतंजलीने सांगितलेले हे प्राणायाम करा, होईल चमत्कारिक फायदा
GH News August 11, 2025 10:17 PM

Baba Ramdev : योगगुरू बाबा रामदेव यांनी पतंजलीच्या माध्यमातून आयुर्वेदिक उपचार पद्धती घराघरात पोहोचवली आहे. त्वचारोग असो किंवा अन्य आरोग्यविषयक अडचण असो बहुसंख्य आजारांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून चांगले उपचार केले जातात. आजघडीला पतंजलीची अनेक अत्पादनं तुमच्या आजूबाजूला स्टोअर्सवर तसेच ऑनलाईन पोर्टल्सवरही आढळतात. रामदेवाबाबांचे शिक्षण आणि पतंजली कंपनीने तयार केलेली उत्पादन यांच्या मदतीने अनेक लोकांच्या आरोग्यविषयक समस्या कमी झालेल्या आहेत. दरम्यान, रामदेव बाबांनी शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यासाठीही काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. त्या कोणत्या आहेत तेच जाणून घेऊ या…

आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोकांकडे वेळ फार कमी आहे. त्यामुळेच अनेक लोकांना शारीरिक तसेच मानसिक समस्या निर्माण होतात. मात्र पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांनी काही प्राणायाम सांगितलेले आहेत. हे प्राणायाम तुम्ही रोज केले तर तुमचे मानसिक तसेच शारीरिक आरोग्य चांगले राहू शकते. या प्राणायामांमुळे स्ट्रेस, इन्झायटी दूर होऊ शकते. हे प्राणायम केल्यास नकारात्मक विचार दूर होतात.

अनुलोम विलोम

बाबा रामदेव यांच्या पतंजली वेलनेसनुसार अनुलोम-विलोम एक फारच प्रभावी प्राणायाम आहे. हा प्राणायाम केल्यास शरीरातील प्राणवायूचे प्रमाण योग्य राहण्यास मदत होते. तसेच रक्तदाब योग्य प्रमाणात राहतो. मानसिक शांतीही लाभते.

भ्रस्त्रिका प्राणायाम

हा प्राणायम ध्यान साधनेच्या आसनात बसून करावा लागतो. हे आसन करताना स्वत:ला शांत ठेवावे. शांततेत शरीराला कोणताही ताण न देता श्वास घ्यावा आणि बाहेर सोडावा लागतो. असे केल्यास फुफ्फूसाची क्षमता वाढते. तसेच शरीरातील ऊर्जा कायम राहतो. हा प्राणायाम केल्यास मानसिक थकवादेखील दूर होतो

कपालभाती प्राणायाम

पतंजली वेलनेसनुसार कपालभाती प्राणायामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच हृदय, फुफ्फुसाचे आरोग्य सुधारते.

भ्रामरी प्राणायाम

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी भ्रामरी प्राणायाम फार उपयोगी पडतो. या प्राणायाममध्ये दोन्ही हात डोळ्यांवर ठेवून तीन ते पाच सेकंदाच्या कालावधित लयबद्ध पद्धतीने श्वास घ्यावा लागतो. हा श्वास घेताना ओम…असा उच्चार करावा लागतो.

उज्जायी प्राणायामचे फायदे काय आहेत?

मानसिक शांती मिळावी तसेच स्ट्रेस कमी व्हावा तसेच झोपेत सुधारणा व्हावी यासाठी उज्जायी प्राणायाम करावा. या प्राणायामामुळे फुफ्फुसाचे आरोग्य सुधारते. ध्यानमुद्रेत बसून हा प्राणायाम करावा लागतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.