कऱ्हाड : शहरातील हद्दवाढ भागात भटक्या कुत्र्यांचा वावर व उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नागरी वस्तीत सर्रास दिवसरात्र भटकी कुत्री फिरत असल्याने त्यांच्यापासून लहान मुलांसह नागरिक, महिलांनाही धोका निर्माण झाला आहे. दिवसा फिरणारी कुत्री लहान मुलांमागे लागत आहेत. दोन वर्षांपूर्वी शिक्षक कॉलनी परिसरातील एका लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला होता. तेथील तरुणांनी प्रसंगावधान राखून मुलाला वाचवले. अशा घटनांमुळे परिसरात भीतीचे सावट आहे. कुत्र्यांनी हल्ला केल्यावरच अथवा एखादी दुर्घटना घडल्यावरच पालिकेला जाग येणार का? असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारत आहेत.
Success Story: 'सातारच्या सोहम घोलपला गुगलमध्ये ४० लाखांचे पॅकेज'; कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी, संभाषणात्मक एआय सल्लागारपदी निवड हजारांहून अधिक कुत्रीशहरापेक्षाही अधिक विस्तारलेल्या हद्दवाढ भागाच्या नियोजनाचाच पसारा वाढला आहे. त्या भागाचे नियोजन करताना पालिकेची दमछाक होते. त्यामुळे त्या भागातील नागरिकही आता वैतागले आहेत. सुविधा नाहीत, तरीही त्यांचे जगणे सुरूच आहे. अशा स्थितीत आता भटक्या कुत्र्यांच्या त्रासाची त्यात भर पडली आहे. भटकी कुत्री धोकादायक झाली आहे. किमान एक हजारच्या आसपास भटकी कुत्री त्या हद्दवाढ बागाच्या परिसरात असावी, असा जाणकारांचा अंदाज आहे. वास्तविक, अन्नाच्या शोधार्थ नागरी वस्तीत भटकणाऱ्या कुत्र्यांवर कोणाचेच नियंत्रण नाही, अशी स्थिती आहे.
कॉलन्यांत बिनधास्त वावरहद्दवाढ भागात पालिकेचा घनकचरा प्रकल्प आहे. पूर्वी त्या परिसरात कचऱ्याचे प्रमाणात सर्वाधिक होते. आता त्यावर नियंत्रण आले असले, तरी घनकचऱ्याभोवती कुत्र्यांचा वावर आहे. त्यामुळे तीच कुत्री त्या परिसरात अन्न मिळाले नाही, की नागरी वस्तीत म्हणजेच लगतच्या कॉलन्यांमध्ये भटकताना दिसतात. त्यामुळे वाढीव हद्दीतील बारा डबरे, मुजावर कॉलनी, शांतीनगर, पोस्टल कॉलनी सुमंगलनगर आदी परिसरात भटक्या कुत्र्यांचे टोळके वारंवार दिसतो आहे.तो टोळके नागरी वस्तीत बिनधास्त फिरत आहे. त्यामुळे अन्न न मिळाल्यास ती कुत्री आक्रमक होत नागरिकांवर हल्ला करण्याच्या तयारीत असतात.
दिवसरात्र भीतीपूर्वी हद्दवाढ भागात भटक्या कुत्र्यांची रात्री उशिरा येणाऱ्यांवर दहशत होती. मात्र, त्या भागात स्थानिकांवरही त्या कुत्र्यांच्या हल्ल्याची भीती दिसते आहे. त्यामुळे दिवसरात्र भटक्या कुत्र्यांच्या दहशतीचा त्या नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम शक्य झाला आहे. नागरिकांनी जीव मुठीत घेऊन लहान मुलांना वाचविण्याची काळजी करत चालत जावे लागते. अनेकदा दगड मारूनही कुत्रे जात नाही. दगड मारणाऱ्यांवरच ते गुरगुरताना दिसते. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.
MPSC Success Story: एमपीएससी परीक्षेत माेहिनी गाेळे-किर्दतची हॅट्रीक';वडिलांनी पिठाची गिरण चालवून स्वप्नांना दिलं बळ,यशाला घातली गवसणीशहराच्या वाढीव हद्दीत कुत्र्यांच्या हल्ल्याची एखादी घटना घडण्याची अधिकाऱ्यांनी वाट न बघता तातडीने उपाययोजना कराव्यात. भटक्या कुत्र्यांचे योग्य नियोजन लावावे. त्याबाबत वारंवार अधिकाऱ्यांना कल्पना देऊनही लक्ष देत नाहीत. बारा डबरे, मुजावर कॉलनी, शांतीनगर, पोस्टल कॉलनी, सुमंगलनगर परिसरात वारंवार कुत्र्यांचे टोळके फिरत आहे. पालिकेने तातडीने उपाययोजना कराव्या, अन्यथा आंदोलन करावे लागेल.
- राहुल खराडे, सामाजिक कार्यकर्ते, कऱ्हाड