Satara News: 'मोकाशी'चे दोघे विद्युत सहाय्यकपदी; राहुल पाटील, अनिकेत होलमुखे यांचा निवडीबद्दल सत्कार
esakal August 13, 2025 08:45 PM

कोपर्डे हवेली : राजमाची येथील मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील दोन विद्यार्थ्यांची विद्युत सहाय्यकपदी निवड झाली. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाच्या परीक्षेत आयटीआय इलेक्ट्रिशियन विभागातील राहुल नामदेव पाटील व अनिकेत संदीप होलमुखे यांची विद्युत सहाय्यकपदी निवड झाली.

या विद्यार्थ्यांचा संस्थेचे संचालक विलास चौधरी, प्राचार्या एस. एम. पवार यांच्यामार्फत सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव अभिजित मोकाशी, उपाध्यक्ष डॉ. विश्वजित मोकाशी यांनी अभिनंदन केले. २०१५ पासून कार्यरत या संस्थेत इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिकल व सिव्हिल हे व्यावसायिक ट्रेड उपलब्ध आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.