क्रिकेटर संजय बांगर यांचा मुलगा नुकताच मुलगी झाला आहे. आता त्यांच्या मुलाने आपले नाव बदलून अनाया बांगर असे केले आहे. अगोदर मुलगा आणि नंतर मुलगी झालेल्या अनायाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. पण अशी एक सुंदर ट्रान्सजेंडर आहे, जिच्या सौंदर्याचे लाखो लोक दिवाने आहेत.
तिचे नाव इल्ला दी वर्मा (Ella D’ Verma) असे आहे. ती आज सगळीकडे ट्रान्स क्विन म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे आज तिने तिच्या सौंदर्याच्या जोरावर मॉडेलिंग क्षेत्रात आपले एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे.
तिचे इन्स्टाग्रामवर आज घडीला 4 लाख 72 हजार फॉलोअर्स आहेत. आजघडीला ती एक नावाजलेली आणि प्रसिद्ध मॉडेल असली तरी तिचा हा प्रवास सोपा नव्हता.
इल्ला सध्या दिल्लीत राहते. तिचे शिक्षणही दिल्लीतच झालेले आहे. तिचा जन्म झाला तेव्हा ती मुलाच्या स्वरुपात होती. घरच्यांनाही वाटले की ती मुलगाच आहे. मात्र ती जशी-जशी मोठी होऊ लागली तसे तसे तिच्यात मुलीसारखे बदल होऊ लागले.
अगोदर तिला दाढी-मिशा होत्या. नंतर मात्र तिच्या शरीरात बदल व्हायला लागले आणि आपण मुलगा नसल्याचे तिला समजू लागले. ती शाळेत खूप हुशार होती. तिला गायन, नृत्य, खेळ आवाडायचा. पण प्रत्येक ठिकाणी तिची थट्टा करण्यात आली.
त्या काळात तिचे मित्रही तिच्यापासून दूर झाले. तिच्या घरच्यांना हे सगळं समजल्यानंतर ते तिला ऑस्ट्रेलियात पाठवणार होते. मात्र कोरोना महासाथीमुळे लॉकडाऊन लागला आणि तिला घरातच राहावे लागले.
मात्र लॉकडाऊनच्या काळात तिने स्वत:वर खूप काम केले. आणि लॉकडाऊन संपल्यावर ती एक सुंदर मुलीच्या रुपात सर्वांसमोर आली. आज इन्स्ट्राग्राम तसेच इतर सोशल मीडियावर तिचे लाखोंनी चाहते आहेत. करिअरमध्ये ती एका नव्या उंचीवर आहे.