नवी मालिका 'बडे अच्छे लगते है'चा रिमेक असण्यावर आता तेजश्रीनेच दिली प्रतिक्रिया; म्हणते- कॉपी केली म्हणजे काय...
esakal August 13, 2025 10:45 AM

छोट्या पडद्यावर नुकतीच तेजश्री प्रधानची नवी मालिका 'वीण दोघातली ही तुटेना' प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. या मालिकेने पहिल्याच भागात प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यात तेजश्री स्वानंदीच्या भूमिकेत दिसतेय तर अभिनेता सुबोध भावे समरच्या भूमिकेत आहे. मात्र झी मराठीची ही मालिका गाजलेल्या हिंदी मालिकेचा रिमेक आहे. 'वीण दोघातली ही तुटेना' ही मालिका हिंदी मालिका 'बडे अच्छे लगते हैं २' चा रिमेक आहे. आता या चर्चांवर स्वतः तेजश्रीने प्रतिक्रिया दिली आहे,.

तेजश्रीने नुकतीच नवशक्तीला मुलाखत दिली. यात बोलताना ती म्हणाली, 'आपलं मनोरंजनविश्व खूप जुनं आहे. यात आपण भावनांबद्दल बोलतो. या भावना सारख्याच आहेत. फक्त त्या वेगवेगळ्या पद्धतीने मांडल्या जातात. त्यामुळे इतकी वर्ष झाल्यानंतर आपल्या हे त्याच्यासारखं, ते याच्यासारखं हे कुठे ना कुठे वाटणारंच आहे. त्यात टीव्ही हे वर्षानुवर्ष चालणारं सगळ्यात जास्त डॉमिनेटिंग माध्यम आहे. त्यामुळे हे होणारंच आहे. पण तरी ती मांडण्याची, सादर करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असणार आहे. त्यातले बारकावे वेगळे असणार आहेत. त्यामुळे कितीही वेळा असं झालं की हा याचा रिमेक, तो त्याचा रिमेक होणारच आहे.'

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

ती पुढे म्हणाली, 'तरी मी कायम सांगते की कदाचित एका वेगळ्या भाषेचा रिमेक होत असला तरी त्या त्या भाषेची संस्कृती वेगळी असते. त्या त्या भाषेची जडण घडण, सण वेगळे असतात. ते साजरं करायची पद्धत वेगळी असते. त्यामुळे तुम्हाला कदाचित त्याचं वन लाईन मिळेल की हे जे चालू आहे ते तिथेही झालं होतं. पण ते सादर करण्याची पद्धत नक्कीच वेगळी असणार आहे. आज आपण एकाच चॅनलच्या अंतर्गत अनेक भाषा एक्स्प्लोर करत आहोत. हे भारतीयांसाठी किती चांगली गोष्ट आहे. एखाद्या भाषेत गाजलेली गोष्ट आपण दुसऱ्या भाषेत बोलू शकणार असू तर ही चांगलीच गोष्ट आहे.'

तेजश्री म्हणाली, 'ती चांगल्या पद्धतीने स्वीकारली पाहिजे. कॉपी करतोय म्हणजे ती फ्रेम टू फ्रेम कॉपी होईल असं नाही. बराच फरक कायम असणारच आहे. यापुढेही हे होत राहणार आहे. प्रत्येकातला वेगळेपणा काढण्यासाठी क्रिएटिव्ह्ज प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तुम्हाला तेवढीच मजाही येणार आहे.' तेजश्री आणि सुबोध यांची ही मालिका संध्याकाळी ७. ३० वाजता प्रक्षेपित होते. प्रेक्षक आता पुढेच भाग पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

प्रेक्षकांना कसा वाटला 'वीण दोघातली...'चा पहिला एपिसोड? नेटकरी म्हणाले- बाई पहिलाच भाग आणि तेजश्री...
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.