राष्ट्रवादीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांना एकनाथ खडसे यांनी चेकाळल्याच्या वक्तव्याच्या निषेध सुरू आहे. चाकणकरांच्या समर्थनार्थ भाजप रस्त्यावर आली असून खडसे यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन देखील त्यांनी केले. एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर हे रेव्ह पार्टी प्रकरणात अडकले. या कारवाईमुळे गिरीश महाजनांकडे खडसे हे बोट दाखवत आहेत. खडसे आणि गिरीश महाजन यांचा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. यावर प्रथमच रक्षा खडसे यांनी भाष्य केले आणि म्हटले की, मला वेदना होत आहेत. या भाष्यामुळे राजकीय तर्कवितर्क लावली जात आहेत.
दुसरीकडे पतीसाठी रोहिणी खडसे ह्या पुण्यात तळ ठोकून आहेत. गिरीश महाजन म्हणत आहेत की, रेव्ह पार्टीचा तपास पोलीस करत आहेत. त्यामुळे यावर न बोललेलं बरं तर दुसरीकडे एकनाथ खडसे म्हणतात हनी टॅप प्रकरणात प्रफुल लोढाला जेलमध्ये मारून टाकतील. मात्र, यासर्व आरोपांमध्ये ज्या रूपाली चाकणकर ह्या अजित पवार पक्षाच्या आहेत आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. एकही कार्यकर्ता त्याच्या समर्थनार्थ आंदोलनात दिसून आलेला नाही. त्याउलट भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते खडसेंच्या विरोधात आंदोलन जळगावात करताना दिसत आहे.
एकनाथ खडसेंचे कार्यकर्ते शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते खडसेंसाठी रस्त्यावर उतरत आंदोलन करत आहेत. या सर्व आरोपांमध्ये विषय ठरला तो म्हणजे रक्षा खडसेंचे भाषण मला वेदना होत आहेत. त्यामुळे कुठेतरी या वादंगामुळे रक्षा खडसे नाराज असल्याचे दिसते. आता पुन्हा एकदा या तिघांच्या वादाचा स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील उडी घेतली आहे. रक्षा खडसेंनी आपले सासरे एकनाथ खडसे यांना सल्ला देण्याबाबत भाष्य केलं. रक्षा खडसेंना वेदना होत असतील तर कुटुंबावर आलं तर वेदना होतीलच. मात्र आपली पक्षनिष्ठा जपावी अशा प्रकारे रक्षा खडसेंना आमदारांनी सल्ला दिला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, नॉन्सेन्स राजकारण व्हायला नको. कुटुंबावर आल्यावर वेदना सगळ्याला होतात, पक्षनिष्ठा जपली पाहिजे. रक्षा खडसेंना आमदार चंद्रकांत पाटील यांनी हा खोचक सल्ला दिला आहे. राजकीय पक्ष घेऊन चालताना कुटुंब बाजूला ठेवावे लागते. एका कुटुंबात यात चार चार पक्ष असू शकतात किंवा पक्षाचा विषय येतो तेव्हा फक्त पक्षच पाहायला पाहिजे अशी महाराष्ट्राच्या इतिहासाची संस्कृती आहे, असे त्यांनी म्हटले.