बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐश्वर्याचे वय 51 वर्ष आहे. तिचा जन्म 1 नोव्हेंबर 1973 रोजी कर्नाटकातील मंगलोर येथे झाला. तिचा पती , अभिनेता हा अभिषेक बच्चन 49 वर्षांचा आहेत. अभिषेकचा जन्म 5 फेब्रुवारी 1976 रोजी मुंबईत झाला.
‘देसी गर्ल’ ते ग्लोबल स्टार असा प्रवास केलेल्या प्रियांका चोप्राने 2018 साली अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केले. प्रियांका निकपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. प्रियांका 43 वर्षांची आहे तर निक पुढील महिन्यात 33 वर्षांचा होईल.
सौंदर्यवती अभिनेत्री कतरिना कैफ देखील तिचा पती विकी कौशलपेक्षा मोठी आहे. दोघांमध्ये पाच वर्षांचे अंतर आहे. कतरिनाचा जन्म जुलै 1983 मध्ये झाला होता. तर विकीचा जन्म सप्टेंबर 1988 मध्ये झाला. 2021 मध्येराजस्थानमध्ये मोठ्या थाटामाटात त्यांचं लग्न झाले.
सैफ अली खानची धाकटी बहीण, अभिनेत्री सोहा अली खान हिने अभिनेता कुणाल खेमूशी लग्न केले. हे लग्न 2015 साली झालं. सोहा अली 46 वर्षांची आहे तर तिचा पती कुणाल सध्या 42 वर्षांचा आहे. ही अभिनेत्री तिच्या पतीपेक्षा चार वर्षांनी मोठी आहे.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू 46 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 7 जानेवारी 1979 रोजी नवी दिल्ली येथे झाला. तर तिचा पती करण सिंग ग्रोव्हरचा जन्म जानेवारी 1982 मध्ये नवी दिल्ली येथे झाला. बिपाशा आणि करण यांचे लग्न 2016 मध्ये झालं.
अभिनेत्री नेहा धुपियाचा जन्म 27 ऑगस्ट 1980 रोजी झाला. अभिनेत्री 44 वर्षांची आहे. तिने 2018 मध्ये अंगद बेदीशी लग्न केलं. अंगद सध्या 42 वर्षांचा आहे. त्याचा जन्म फेब्रुवारी 1983 मध्ये झाला. अंगद त्याच्या पत्नीपेक्षा अडीच वर्षांनी लहान आहे.