पॅरिस : चॅम्पियन्स लीग विजेत्या पीएसजी (पॅरिस सेंट-जर्मेन) संघाने नाट्यमय सांगता झालेल्या सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये टॉटनहॅमवर ४-३ असा विजय मिळवून सुपर कप जिंकला आणि २०२५ मधील आपले पाचवे विजेतेपद मिळवले.
हा सामना कमालीचा चुरशीचा आणि रंगतदार झाला. पेनल्टी शूटआऊटमध्ये नुनो मेंडेसने निर्णायक गोल करून पीएसजीला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. सामना संपायला पाच मिनिटे बाकी असताना टॉटनहॅम २-० ने आघाडीवर होता. ही अखेरची पाच मिनिटे आणि भरपाई वेळ यात दोन गोल करून पीएसजीने २-२ बरोबरी साधली. हा वार्षिक सामना चॅम्पियन्स लीग आणि युरोपा लीग विजेत्यांमध्ये खेळला जातो.
ली कांग-इनने ८५व्या मिनिटाला शानदार गोल करून पीएसजीचे आव्हान जिवंत ठेवले, त्यानंतर बदली खेळाडू गोनालो रामोसने भरपाई वेळेच्या चौथ्या मिनिटाला हेडर मारून सामना २-२ असा बरोबरीत आणला.
पीएसजीसाठी पहिली पेनल्टी घेणारा विटिन्हा अपयशी ठरला, त्यामुळे टॉटनहॅमने २-० आघाडी मिळाली; मात्र मिकी व्हॅन डे व्हेन आणि माथीस टेल या टॉटनहॅमची पेनल्टी कीक वाया गेली चुकवली, त्यानंतर पीएसजीच्या खेळाडूंनी सलग चार पेनल्टी सत्कारणी लावल्या. त्यात शेवटची पेनल्टी मेंडेसची होती.
भरपाई वेळ धरून आम्ही अखेरच्या १० मिनिटांत दोन गोल करू शकलो, त्यासाठी आम्ही खूप भाग्यवान होतो, अशी भावना पीएसजीचे प्रशिक्षक लुईस एन्रिक यांनी व्यक्त केली. पीएसजीने २०२५ मध्ये चॅम्पियन्स लीग, लीग १ आणि कूप दे फ्रान्स अशा तीन विजेतेपदांसह जानेवारीत प्रतिष्ठेची चॅम्पियन्स लीग जिंकली आहे; मात्र क्लब विश्वकरंडक त्यांच्या हातून निसटला. गेल्या महिन्यात क्लब वर्ल्ड विश्वकरंडक अंतिम फेरीत चेल्सीकडून त्यांची हार झाली.
Indian Kho Kho: विश्वविजेत्या खो-खो संघांचा सन्मान; नवी दिल्लीतील स्वातंत्र्यदिन सोहळ्याला विशेष आमंत्रण, मातीतल्या खेळाचा गौरवएन्रिक म्हणाले, आमचे खेळाडू फक्त सहा दिवसांपूर्वीच प्रशिक्षणासाठी परतले होते, त्यामुळे फॉर्म मिळवण्यासाठी त्यांना वेळ लागला. माझ्या खेळाडूंनी शेवटच्या मिनिटापर्यंत विश्वास ठेवला, हेच महत्त्वाचे ठरले. पीएसजीचा गोलरक्षक लुकास चेव्हालियरसाठी हा पहिला सामना संस्मरणीय लिले संघामधून नुकताच संघात आलेला आणि अनुभवी जियानलुईजी डोनारुम्माची जागा घेतलेल्या या गोलरक्षकाची पहिल्याच सामन्यात कसोटी लागली.