Liver Disease Symptoms: हात-पायांमध्ये दिसणारी ही लक्षणे म्हणजे यकृत विकाराचे संकेत
Marathi August 16, 2025 06:25 AM

आपल्या शरीरात असा एक अवयव आहे जो नियमितपणे 500 हून प्रक्रिया दररोज पूर्ण करत असतो. ते म्हणजे आपले यकृत.. होय,यकृताशिवाय शरीरातील इतर अवयव योग्यप्रकारे कार्य करू शकत नाहीत. मात्र तुमचे यकृत निकामी होत असल्याचे संकेत तुमच्या हात-पायांमधून कळू शकतात. कारण तुमच्या हात आणि पायांमध्ये दिसणारी काही लक्षणे ही तुमच्या यकृताबाबत इशारा असल्याचे म्हंटले जाते.

तज्ञांच्या मते, यकृत हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण रक्त स्वच्छ करणे, शरीरातील पोषक तत्वे वाढवणे ही कार्य यकृत करते.

हात लाल पडणे

जर तळहात लालसर दिसत असतील तर हे यकृतासाठी धोक्याचे संकेत असू शकतात. यकृताला नुकसान झाल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण प्रभावित होते आणि तेव्हाच हात लालसर दिसतात.

नसा

पायावर कोळ्याच्या जाळ्यासारख्या नसा दिसणे हे देखील यकृताच्या विकाराचे लक्षण आहे. यकृताच्या कार्यावर परिणाम झाल्यामुळे हे लक्षण दिसते आणि त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होतात.

बोटे एकमेकांना चिकटणे

यकृताच्या कार्यावर परिणाम झाल्यामुळे, पाय आणि हातांच्या बोटांना सूज येते, विशेषतः नखांभोवतीची त्वचा सुजते, ज्यामुळे बोटे एकमेकांना चिकटू लागतात. यकृत योग्यरित्या कार्य करत नसल्यामुळे, शरीरात रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा योग्यरित्या होत नाही त्यामुळे ही लक्षणे दिसू शकतात.

हात आणि पाय पिवळे पडणे

कावीळ हे देखील यकृताच्या आजाराचे लक्षण आहे. डोळे पिवळे पडणे हे देखील चांगले नसते.

सूज

पाय आणि हातांना सूज येणे हे देखील यकृताच्या आजाराचे लक्षण आहे. जेव्हा यकृत योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा पाय आणि हातांसह पोटात पाणी भरण्याची समस्या उद्भवते. या स्थितीला एडेमा म्हणतात. थकवा येणे ही देखील यकृताच्या नुकसानाची लक्षणे आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.