Latest Maharashtra News Updates : मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी; रायगडला रेड अलर्टचा इशारा
esakal August 16, 2025 05:45 PM
Mumbai Rain : मुंबईत अतिमुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळून दोघांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी

विक्रोळीत दरड कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला, तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. या चारही जणांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अचानक झालेल्या या धो-धो पावसामुळे दरड कोसळली आहे. सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला आहे.

Latur Rain : लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; वाढत्या पाण्याच्या लोटामुळे नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण

लातूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सतत मुसळधार पावसाची जोरदार हजेरी लागली आहे. शहरासह धरणक्षेत्रात कोसळलेल्या या पावसामुळे धरणे भरून वाहू लागली आहेत. तेरणा व मांजरा या नद्या दुथडीभरून वाहत असून परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या अविरत पावसामुळे तावरजा, तेरणा आणि मांजरा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या पाण्याच्या लोटामुळे नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Mumbai Local Service : मुंबईसह उपनगरात पुन्हा पाऊस सक्रिय, लोकल सेवा विस्कळीत

मुंबई आणि उपनगरात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. शुक्रवारपासून मुंबईच्या काही भागांत मुसळधार, तर काही ठिकाणी पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या. याचा परिणाम मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या लोकल सेवेवर झाला आहे. पावसाची रिपरिप सुरू असल्याने अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक गाड्या वेळेपेक्षा उशिरा धावत आहेत.

Weather Update : मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी; रायगडला रेड अलर्टचा हवामानचा इशारा

Latest Marathi Live Updates 16 August 2025 : हवामान विभागाने मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये दोन दिवसांसाठी "ऑरेंज" अलर्ट जारी केला आहे. शनिवार आणि रविवारी मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईला लागून असलेल्या ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील ऑरेंज अलर्ट तर रायगडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच यंदाच्या दहीहंडी उत्सवावर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले असून कोणतीही अनुचित घटना किंवा गुन्ह्याचे गालबोट लागू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, या उद्देशाने शहरात जागोजागी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकारे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये मीडियाशी बोलताना मोठी घोषणा केली. मुंबई महापालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत, असं ते म्हणाले. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.