नागपुरात 'वर्क फ्रॉम होम'च्या नावाखाली महिलेची 12 लाखांनी फसवणूक; Instagram च्या 'त्या' जाहिरातीवर क्लिक केली अन्...
esakal August 17, 2025 02:45 AM

नागपूर : शहरात पुन्हा एकदा सायबर फसवणुकीचा प्रकार समोर आला असून, यामध्ये एका गृहिणीची तब्बल १२ लाखांहून अधिक रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे. 'वर्क फ्रॉम होम'च्या आमिषाखाली (Work From Home Scam) ही संपूर्ण घटना घडली असून याबाबत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूरमधील मिनी मातानगर परिसरात राहणाऱ्या अनिता नावाच्या महिलेची ही फसवणूक (Cyber Fraud Nagpur) झाली आहे. इंस्टाग्रामवर रील पाहत असताना तिला वर्क फ्रॉम होमची जाहिरात दिसली. त्यावर तिने क्लिक केल्यावर घरबसल्या काम करून काही हजार रुपये मिळतील, असे सांगण्यात आले.

महिलेवर विश्वास बसावा म्हणून सुरुवातीला फक्त रील लाईक करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवल्यास २ ते ४ हजार रुपये मिळतील, असे दाखविण्यात आले. पुढे विश्वास संपादन केल्यानंतर आरोपींनी तिला विविध टास्क दिले आणि गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगितले.

VIDEO : माजी कृषिमंत्री कोकाटेंनंतर माजी महापौराचा गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल; आंबेडकरी समाजात तीव्र संताप, गंभीर विषय सुरु असतानाच..

या खोट्या आश्वासनांना भुलून अनिताने १२ लाख १६ हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, काही काळानंतर तिला एकाही रुपयाचा परतावा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने तात्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेतली. सध्या पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा सर्वसामान्यांना ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सोलापुरात एसीचा भीषण स्फोट; विवाहित महिलेचा होरपळून मृत्यू, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, पण...
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.