शिवाजी महाराजांच्या काळात किती होता पेशव्यांचा पगार?
esakal August 17, 2025 04:45 AM
Shivaji Maharaj सुराज्य–

शिवाजी महाराजांनी सुराज्याची उभारणी केली ती लष्करी बळावर नव्हे तर चांगल्या मुलकी प्रशासनावर.

Shivaji Maharaj दृष्टीकोन–

महाराजांचा विश्वास होता की न्याय्य व कार्यक्षम प्रशासनाशिवाय खरे सुराज्य निर्माण होऊ शकत नाही.

Shivaji Maharaj अष्टप्रधान–

महाराजांनी राज्यकारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली, जे कार्यकारी मंडळ होते.

Shivaji Maharaj संघटन–

या अष्टप्रधान मंडळात आठपैकी सात मंत्री मुलकी प्रशासनाशी संबंधित होते.

Shivaji Maharaj लष्कर–

फक्त एकच प्रधान लष्करी शाखेशी निगडीत होता आणि त्याला सरनौबत किंवा सरसेनापती म्हणत.

Shivaji Maharaj पेशवा–

अष्टप्रधानांमधील सर्वांत महत्त्वाचा पदाधिकारी होता मुलकी प्रशासनाचा प्रमुख पेशवा.

Shivaji Maharaj मान–

पेशवा ‘प्रथम’ मानला जाई, म्हणजेच इतरांपेक्षा अधिक अधिकार आणि जबाबदारी त्याच्याकडे होती.

Shivaji Maharaj पगार–

पेशव्यांचे वार्षिक वेतन होते तब्बल १५,००० होन.

Shivaji Maharaj सेनापती–

सरसेनापतीचे वार्षिक वेतन पेशव्यांपेक्षा कमी म्हणजे १२,००० होन होते.

Shivaji Maharaj अधिकार–

युद्धप्रसंगी पेशव्यांना स्वतः युद्धात सहभागी होण्याची परवानगी होती.

Shivaji Maharaj मर्यादा–

मात्र सेनापतींना मुलकी प्रशासनात हस्तक्षेप करण्याची परवानगी नव्हती.

तत्त्वज्ञान–

या व्यवस्थेतून महाराजांनी लष्करापेक्षा प्रशासनाला प्राधान्य देऊन सुराज्याची संकल्पना बळकट केली.

Shivaji Maharaj elephants name जसं 'महादेवी हत्ती' तसं शिवाजी महाराजांच्या हत्तींची नावे काय होती? येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.