84399
रुग्णसाहित्य जपून वापरा, परत करा!
कणकवलीत मोफत सेवा; सीताबाई-राजाराम पावसकर केंद्र
कणकवली, ता. १६ ः शहरातील डॉ. सुहास राजाराम पावसकर यांच्या संकल्पनेतून गरजू रुग्णांसाठी ‘सीताबाई-राजाराम पावसकर रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्र’ सुरू करण्यात आले. रुग्णांना लागणारे साहित्य येथे मोफत उपलब्ध होणार आहे. या केंद्राचा प्रारंभ रोटरी क्लबचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे आणि डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या हस्ते झाला.
कणकवली व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, डॉ. प्रीती पावसकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, असलदे सोसायटी अध्यक्ष भगवान लोके, ॲड. दीपक अंधारी, माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, जयेंद्र म्हापसेकर, ॲड. प्रकाश पावसकर, रमाकांत पावसकर, सुप्रिया नलावडे, दीशा अंधारी, गणेश काटकर, सोनू मालविया, सौ. राठोड, अंकिता कर्पे, अनिल कर्पे, प्राजक्ता नारकर, रूपेश बांदेकर, संदीप पावसकर, विद्याधर पावसकर, सिद्धेश पावसकर, विशाल कामत, अमोल नष्टे, राजा राजाध्यक्ष, बंडू खोत, राजन पारकर, आनंद पोरे, रूपेश खाड्ये, राजू मानकर, डॉ. अनंत नागवेकर, डॉ. बी. जी. शेळके, डॉ. प्रशांत मोघे, डॉ. गीता मोघे, डॉ. नितीन शेट्ये, डॉ. विनय शिरोडकर, डॉ. प्रवीण बिरमोळे, डॉ. शमिता बिरमोळे, डॉ. स्वप्नील राणे आदी उपस्थित होते.
डॉ. पावसकर म्हणाले, ‘सध्या वैद्यकीय सेवा महाग होत आहेत. त्यामुळे रुग्णांना तात्पुरत्या वापरासाठी लागणारे साहित्य या केंद्राच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविला आहे. या केंद्रात फाऊलर कॉट, साधी कॉट, व्हीलचेअर, वॉकर, वॉटर बेड, एअर बेड, नेब्युलायझर, ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर आदी साहित्य उपलब्ध आहे. गरज पडल्यास रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक आधारकार्डाची प्रत, पत्ता व संपर्क क्रमांकाची नोंद करून साहित्य घेऊ शकतात. वापर संपल्यावर साहित्य सुस्थितीत परत करणे बंधनकारक असेल. गरजूंनी सेवेचा लाभ घ्यावा.’