rat१४p२७.jpg-
२५N८४५०५
रत्नागिरी ः येथील सीमाशुल्क कार्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे विधी साक्षरता कार्यक्रमात उपस्थित मान्यवर.
सीमाशुल्क कार्यालयात
विधी साक्षरता कार्यक्रम
रत्नागिरी, ता. १६ ः जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीतर्फे येथील सीमाशुल्क (कस्टम) कार्यालयातील सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्याकरिता कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांचा लैंगिक छळ (संरक्षण प्रतिबंध व निवारण) कायदा २०१२ यावर साक्षरता शिबिर बुधवारी उत्साहात झाले.
साक्षरता शिबिरावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाचे सचिव, न्यायाधीश आर. आर. पाटील व बाल न्यायमंडळाच्या सदस्या विनया घाग, साहाय्यक आयुक्त कस्टम कार्यालय रत्नागिरीचे संदीप कृष्ण आदी उपस्थित होते. घाग यांनी कार्यालयामध्ये महिला सहकाऱ्यांशी वागताना पुरुष कर्मचाऱ्यांनी काय काळजी घ्यावी या विषयी मार्गदर्शन केले तर पॉश कायद्याच्या सविस्तर तरतुदीबाबत आर. आर. पाटील यांनी मार्गदर्शन केले. कस्टम ऑफिसर घागर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
---