मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा जळफळाट, चीन आणि भारतामधील घडामोडींना वेग, अजित डोभाल..
GH News August 17, 2025 02:15 PM

अमेरिका आणि भारतात टॅरिफच्या मुद्दावरून तणाव निर्माण झालाय. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला सारख्या धमक्या दिल्या जात आहेत. भारताच्या विनाशाबद्दल त्यांनी थेट भाष्य केले. भारत हा अमेरिकेपुढे झुकत नसल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा जळफळाट सध्या सुरू आहे. भारतावर 50 टक्के टॅरिफ अमेरिकेकडून लादण्यात आलंय. गेल्य काही वर्षांमध्ये चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये एकप्रकारे व्यापार युद्ध रंगताना दिसतंय. मात्र, चीनवर टॅरिफ लावायला अमेरिका घाबरलीये. चीनवरील टॅरिफच्या मुद्दाला त्यांनी 90 दिवसांचा वेळ दिला असून टॅरिफमधून चीनच सुटका करण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत.

फक्त चीनच नाही तर बांगलादेश, पाकिस्तान यांच्याबद्दली टॅरिफवरून अमेरिकेची वेगळी भूमिका आहे. या देशांना भारताच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात टॅरिफ लावले आहे. यामुळे जगासमोर अमेरिकेची दुटप्पी भूमिका ही समोर आलीये. टॅरिफच्या मुद्दावरून आता चीन आणि भारताची जवळीकता वाढल्याचे चित्र आहे. दोन्ही देश अमेरिकेच्या विरोधात एकत्र येताना दिसत आहेत. चीनचे विदेश मंत्री हे दोन दिवसीय भारत दाैऱ्यावर येणार आहेत. यावेळी काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल.

भारताच्या विदेश मंत्रालयाने चीनचे विदेश मंत्री वांग यी हे भारताच्या दोन दिवसीय दाैऱ्यावर येणार असल्याचे सांगितले. वांग यी हे या दाैऱ्यादरम्यान अजित डोभाल यांच्यासोबत चर्चा करतील. सीमेबद्दल या दोघांमध्ये चर्चा होणार आहे. यासोबतच त्यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठक पार पडले. या बैठकीकडे सर्वांच्या नजरा आहेत. हा दाैरा अमेरिकेने भारतावर लादलेल्या टॅरिफनंतर अत्यंत महत्वाचा आहे.

अमेरिकेकडून या दाैऱ्यावर बारीक नजर आहे. टॅरिफच्या मुद्दावरून भारत आणि अमेरिकेतील जवळीकता वाढली आहे. हे डोनाल्ड ट्रम्प यांना अजिबात पटणारे नाहीये. भारताच्या बाजारपेठेत अमेरिकी कंपन्या मोठ्या प्रमाणात कमाई करतात. हेच नाही तर कोट्यावधीची त्यांची उलाढाल आहे. भारतावर जर अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावले तर भारत देखील अमेरिकी कंपन्यांवर थेट कारवाई करण्याच्या तयारी आहे. हा अमेरिकेसाठी अत्यंत मोठा धक्का म्हावा लागेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.