हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या झाडाला खूप पवित्र मानलं गेलं आहे. असं म्हटलं जातं की ज्या घरात तुळस असते त्या घरावर सदैव लक्ष्मी मातेची कृपा राहाते, त्या घरात कधीच पैशाची कमी भासत नाही. तिजोरी धनाने भरलेली राहाते. त्यामुळेच वेगवेगळ्या सणांना आणि व्रतांमध्ये तुळशीची पूजा केली जाते. हिंदू धर्मामध्ये अनेक देवी देवतांना तुळशीचे पानं आणि मंजिरी अर्पण करतात. सकाळी स्नान करून दररोज तुळशीची पूजा केल्यानं घरात सुख, समृद्धी येते, सर्व कष्ट दूर होतात, असं मानलं जातं. मात्र तुम्हाला माहिती आहे का? की अशा काही गोष्टी आहेत, ज्या वास्तुशास्त्रानुसार तुळशी जवळ ठेवण अशुभ मानलं गेलं आहे, ज्यामुळे तुमच्या घरात गरीबी येऊ शकते, जाणून घेऊयात काय आहेत त्या वस्तू?
बूटं-चपला – वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या झाडाजवळ चुकूनही चप्पल ठेवू नये, यामुळे तुळशीसोबतच माता लक्ष्मीचा देखील अपमान होतो, त्यामुळे तुमच्या घरात आर्थिक संकट निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जिथे तुळस आहे, तो परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे.
झाडू – तुळस ही भगवान विष्णू यांना खूप प्रिय आहे. त्यामुळेच तुळशीचे पानं भगवान विष्णू यांना अर्पण केले जातात. वास्तुशास्त्रानुसार तुळशीजवळ कधीही झाडू ठेवला नाही पाहिजे. यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचाही अपमान होतो. तुळशीजवळ झाडू ठेवल्यामुळे धनहानी होऊ शकते, त्यामुळे तुळशीजवळ कधीही झाडू ठेवू नये.
शिवलिंग – तुम्ही तुळस ज्या कुंडीमध्ये लावली त्या कुंडीमध्ये चुकूनही शिवलिंग ठेवू नये, यामुळे तुमच्यावर अनेक संकट येऊ शकतात.
काटे असलेली झाडं – तुळस जिथे आहे, तिथे चुकूनही काटे असलेली झाडं लावू नयेत, यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो.
कचऱ्याची बादली – जिथे तुळस आहे, तो परिसर नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे, या परिसरात कचरा, कचऱ्याचा ढिग किंवा कचऱ्याची बादली ठेवू नका, कारण यामुळे लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांची अवकृपा होते, तुमच्यावर आर्थिक संकट येऊ शकतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)