स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मेगा भरती, आजच करा अर्ज, सरकारी नोकरी करण्याची हीच ती संधी..
Tv9 Marathi August 16, 2025 07:45 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झाली असून अर्ज करण्याची शेवटी तारीख 26 ऑगस्ट आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावी लागतील. अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करा, सरकारी नोकरी करण्याची यापेक्षा दुसरी कोणती मोठी संधी असू शकत नाही. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. 6589 पदांसाठी भरती सुरू आहे. या भरतीतून प्रोबेशनरी अधिकाऱ्यांची पदे भरली जातील.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायची आहेत. sbi.co.in या साईटवर जाऊन अर्ज करता येतील आणि इथेच आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरतीसाठी शिक्षणाची अट लागू करण्यात आली आहे. कोणत्याही विद्यापीठातून पदवी घेतलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 20 ते 28 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये सरकारी नियमानुसार थोडी शिथिलता देण्यात आलीये.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना एक परीक्षा द्यावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेत पास झालेले उमेदवारच पुढच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरतील. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला 750 रूपये फीस ही भरावी लागेल. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना आपल्याला काही कागदपत्रांची पुर्तता कारावी लागणार आहे. ज्यावेळी तुम्ही भरतीसाठी अर्ज करत आहात, त्यावेळी ती कागदपत्रे अपलोड करा.

थेट सरकारीनोकरी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. पदवीधरांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज करावा. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 ऑगस्ट 2025 आहे अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. अजिबात वेळ न घालता फटाफट अर्ज करा. मागील काही दिवसांपासून अनेक बॅंकांमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामध्येच आता स्टेट बँक ऑफ इंडियाकडूनही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.