'मला त्याचा 'तो' भाग खूप आवडतो' अभिनेत्रीला नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टबद्दल कमेंट करणं पडलं महागात, नेटकरी म्हणाले, 'हेच का संस्कार'
esakal August 16, 2025 09:45 PM

1 रुबिना दिलैकने पती अभिनव शुक्लाच्या प्रायव्हेट पार्टबद्दल ओपनली कौतुक केलं.

2 तिचं हे विधान सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून ती ट्रोलही होत आहे.

3 काही नेटकऱ्यांनी तिचं समर्थन करून “यात वाईट काही नाही” असंही म्हटलं.

मनोरंजन विश्वात अनेक कलाकार जोडपी आहेत, जी चाहत्यांना प्रचंड आवडतात. त्यातीलच एक जोडपं म्हणजे अभिनेत्री रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला. रुबिनानं आजवर अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. दरम्यान तिने नवऱ्यासोबत 'पती पत्नी और पंगा' या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने नवऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं.

'पती पत्नी और पंगा' या रिअॅलिटी शोमध्ये नवरा-बयकोचं एकमेकांसोबत किती बॉण्डिगं आहे, हे पहायला मिळतं. रुबिना आणि अभिनव यांचं बॉण्डिंगही खूप खास आहे. या शोमध्ये रुबीना नवऱ्याचं कौतूक करताना पहायला मिळाली.

या शोमध्ये रुबिनाला एक टास्क देण्यात आला. ज्यामध्ये तिला विचारण्यात आलं की, तुला अभिनवमध्ये सर्वांत जास्त काय आवडतं. यावर उत्तर देताना तिने त्याच्या शरीराच्या प्रायव्हेट पार्टबद्दल उघडपणे कौतूक केलं. रुबिनानं एक चित्र काढलं आणि म्हणाली, 'हे पीच आहे. आपल्याला सर्वांना माहितीय व्हॉट्सअॅपवर पीच कसा प्रसिद्ध आहे. ज्याचा अर्थ सुंदर बम असा आहे.'

तिच्या या वक्तव्यानंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. अनेकांनी तिच्या संस्कारावर मुद्दा उपस्थित होता. दरम्यान सध्या सोशल मीडियावर रुबिनाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. परंतु काही नेटकऱ्यांनी तिचं कौतूक करत यात काय वाईट असल्याचं म्हटलंय.

FAQs

रुबिना दिलैकने कोणत्या शोमध्ये हे वक्तव्य केलं?

‘पती पत्नी और पंगा’ या रिअॅलिटी शोमध्ये.

तिने नक्की काय म्हटलं?

तिने पती अभिनव शुक्लाच्या प्रायव्हेट पार्टचं कौतुक करत “मला त्याचा पीच (खालचा भाग) खूप आवडतो” असं म्हटलं.

या विधानावर नेटकऱ्यांनी कशी प्रतिक्रिया दिली?

अनेकांनी तिला ट्रोल केलं आणि संस्कारावर प्रश्न उपस्थित केला.

बापरे! जयंतचे डोळे जाणार? जान्हवीच्या मदतीला 'तो' येणार... लक्ष्मी निवास मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले...'असला फालतूपणा'
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.