Bhorya Independence Day Speech Video : स्वातंत्र्यदिनानिमित्त भोऱ्यानं केलं पुन्हा एक तुफान भाषण; सोशल माडियावर प्रचंड व्हायरल!
esakal August 16, 2025 07:45 PM

Bhorya Independence Day Speech Goes Viral : भारत आज आपला ७९वा स्वातंत्र्यदिन प्रचंड उत्साहात साजरा करत आहेत. देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. तर सकाळापासून सर्वच ठिकाणी ध्वजारोहण झाले. नेते मंडळींची भाषणंही झाली. याशिवाय शाळा, महाविद्यालयांमध्येही ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले. एकूणच  संपूर्ण देशभरात आज उत्साहाचे वातावरण आहे.

सोशल मीडियावर सर्वजण स्वातंत्र्यदिनाच्या एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. विविध व्हिडिओ आणि पोस्ट शेअर केल्या जात आहेत. यामध्ये आता एक व्हिडिओ आज प्रचंड व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ एका शालेय विद्यार्थ्याचं आहे, ज्याला सर्वजण भोऱ्या म्हणून ओळखतात.

View this post on Instagram

A post shared by Sakal News (@sakalmedia)

स्वातंत्र्यदिनानिमत्त भोऱ्याने एक जबरदस्त भाषण केलं आहे. ज्यामध्ये त्याने अगदी विधिमंडळात पत्ते खेळणाऱ्या मंत्र्यापासून ते  शेतकरी आत्महत्या अन् कोल्हापूरातील महादेवी हत्तीनपर्यंतच्या मुद्य्यांवर मत मांडलं आहे. हे भाषण करताना भोऱ्या अगदी बिनधास्तपणे आणि निर्भिडपणे बोलताना दिसला.

Sanjay Raut announcement: संजय राऊतांची मोठी घोषणा!, ठाकरे बंधू मुंबईसह ‘या’ महापालिका निवडणूक एकत्र लढवणार

खरंतर भोऱ्याची पहिली ओखळ ही याआधीच महाराष्ट्राला झालेली आहे. या अगोदरही भोऱ्याने शाळेत केलेलं एक तुफान भाषण प्रचंड व्हायरल झालेलं आहे. त्यावेळी भोऱ्याने निवडणुकीशी संबंधित भाषण केलं होतं. जे प्रचंड विनोदी ठरलं होतं आणि लोकांनी त्याच्या भाषणाचा व्हिडिओही  चांगलाच शेअर केला होता. त्यानंतर आता भोऱ्याने लोकशाहीवर भाषण केलं आहे, जे सध्या व्हायरल होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.