इंदापूर, ता. १६ : शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन ध्वजवंदन करीत उत्साहात साजरा करण्यात आला.
इंदापूर शहरातील प्रशासकीय भवन येथे आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमप्रसंगी तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या हस्ते ध्वजवंदन केले. यावेळी पोलिसांच्या वतीने मानवंदना दिली. पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. नगरपरिषद येथे मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. इंदापूर पोलिस ठाणे येथे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. वन विभागाच्या कार्यालयासमोरच्या प्रांगणात वनपरिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री ठाकूर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.