भारतीय जेवणात चपाती किंवा पोळी हा मुख्य पदार्थ असतो. चपातीशिवाय जेवणाचं ताट अपूर्ण वाटते. ताजी चपाती तर सर्वच खातात. पण, बऱ्याच घरात सकाळी नाश्त्यात रात्रीची शिळी चपाती खाल्ली जाते. चहासोबत किंवा कोणत्याही भाजीसोबत शिळी चपाती हा कित्येक घरातील सकाळचा नाश्ता असतो. काहींच्या मते, शिळं अन्न खाऊ नये, शिळी चपातीच तर नाहीच. पण, तज्ज्ञांच्या मते, शिळी चपाती खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे होतात. शिळी चपाती आरोग्यासाठी खरंच हानिकारक नाही का? जाणून घेऊयात सविस्तरपणे,
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुम्ही शिळी चपाती कशी आणि किती खाताय यावर त्याचे फायदे-तोटे अवलंबून आहेत. तत्पूर्वी पाहूयात शिळी चपाती खाल्ल्याने कोणते फायदे होतात.
शिळी चपाती खाताना हे महत्त्वाचे –
आहारतज्ज्ञांच्या मते, अन्न नेहमी ताजे खावे. जेव्हा आपण कोणताही पदार्थ शिजवून काही काळासाठी ठेवतो तेव्हा तो काही वेळाने शिळा होऊ लागतो. हळूहळू या पदार्थला बॅक्टेरिया, बुरशी खराब करतात. त्यामुळे असा सल्ला दिला जातो की, 1 ते 2 दिवस शिळी चपाती खाल्ल्याने आजारी पडण्याचा धोका कमी असतो पण, जर तुम्ही सतत दररोज शिळी चपाती खात असाल त्याचा आरोग्यावर दिर्घ परिणाम होऊ शकतो.
हेही पाहा –