सोलापुरात एसीचा भीषण स्फोट; विवाहित महिलेचा होरपळून मृत्यू, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, पण...
esakal August 17, 2025 10:45 AM

सोलापूर : सोलापूर शहरातील जुन्या विडी घरकुल परिसरातील गाडगी नगरात गुरुवारी एक हृदयद्रावक (Solapur AC Blast) घटना घडली. घरातील एअर कंडिशनर (AC) मध्ये झालेल्या स्फोटामुळे ४० वर्षीय विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मृत महिलेचे नाव पल्लवी प्रवीण सग्गम असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी त्या आपल्या घरात बसल्या असताना अचानक एसीचा स्फोट झाला. स्फोटानंतर तत्काळ शॉर्टसर्किट (Fire Accident) होऊन घरभर झपाट्याने आग पसरली.

आगीच्या ज्वाळा एवढ्या भीषण होत्या, की पल्लवी सग्गम यांना घरातून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. दरम्यान, आजूबाजूच्या रहिवाशांनी आग लागल्याचे पाहताच आरडाओरडा सुरू केला आणि तातडीने पोलिस तसेच अग्निशमन दलाला कळवले.

Alandi Crime : भेटायला बोलावून मित्राच्या मदतीने ३५ वर्षीय तरुणाला संपवलं; २२ वर्षीय जिम ट्रेनर तरुणीनं का केली हत्या?

अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होताच आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अनेक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. घराची तपासणी केल्यानंतर पल्लवी सग्गम यांचा मृतदेह पूर्णपणे होरपळलेल्या अवस्थेत आढळला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.