Dahi Handi 2025 : ठाण्यात मनसेच्या व्यासपीठावर नटी नाही, लावणी नाही, त्यावर अविनाथ जाधव यांनी दिलं सुंदर उत्तर
Tv9 Marathi August 17, 2025 10:45 AM

गोविंदा रे गोपाळा, बोल बजंरग बली की जय आज मुंबई ठाण्यासह राज्यात सर्वत्र याच घोषणा कानावर ऐकायला मिळत आहेत. दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा होत आहे. वेगवेगळी गोविंदा पथक मंडळाचा टी-शर्ट, बँजो, ढोलसह दहीहंडी फोडण्यासाठी निघाली आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांमध्ये दहीहंडीचा एक वेगळा उत्साह पहायला मिळतो. ठाण्यात अनेक प्रतिष्ठेच्या दहीहंड्या लागतात. मनसे नेते अविनास जाधव यांच्या दहीहंडी उत्सवाची चर्चा आहे. “आमच्या व्यासपीठावर हे खेळाडू आमचे सेलिब्रिटी आहेत. ते त्यांचा आजचा दिवस जगतायत. आमचा म मराठीचा, म मुंबईचा, म महाराष्ट्राचा आहे. या मराठी मुलांसाठी हे व्यासपीठ राज ठाकरेंनी उपलब्ध करुन दिलय. ही कुठलीही पब संस्कृतीतली मुल नाहीयत” असं ठाण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव म्हणाले. त्यांनी सुद्धा दहीहंडी उत्सवाच आयोजन केलं आहे.

तिथे सकाळपासून विविध मंडळ सलामी देण्यासाठी येत आहेत. या दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अविनाषश जाधव टीव्ही 9 मराठी सोबत बोलले. “ही दिवसभर काम करणारी, सकाळी 9 वाजता कामाला जाणारी, संध्याकाळी 7 वाजता घरी येऊन महिनाभर प्रॅक्टिस करुन पुन्हा दुसऱ्यादिवशी सकाळी 9 वाजता कामावर जाणारी ही मुलं आहेत. हा एक दिवस त्यांचा आहे, त्यांच्या आनंदासाठी ठेवला आहे” असं अविनाश जाधव यांनी सांगितलं.

‘तुमच्या व्यासपीठावर कलाकार दिसत नाहीयत’

इतर राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाच्या व्यासपीठावर कलाकार दिसतायत. पण तुमच्या व्यासपीठावर कलाकार दिसत नाहीयत, त्यावर अविनाश जाधव यांनी उत्तर दिलं. “एखादी कलाकार आणावी आणि तिला येण्याचं 5 लाख रुपये मानधन द्यावं. त्याऐवजी हे पाच लाख रुपये या मुलांमध्ये वाटले तर त्यांचा दिवस उत्तम जाईल. त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न आहे” असं अविनाश जाधव म्हणाले.

राज ठाकरे दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहणार का?

राज ठाकरे तुमच्या दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहणार आहेत का? अविनाश जाधव म्हणाले की, “आमची अपेक्षा असते, ते आमचे दैवत आहेत. त्यांना आम्ही निमंत्रण दिलय, ते आलेत तर आनंदाचा दिवस असेल, नाही आलेत, तर 2016 साली राज ठाकरे गोविंदाच्या पाठिशी उभे राहिलेत, त्यांना सलामी देण्यासाठी ही मंडळ इथे येतात” दरवर्षी इथे 250 गोविंदा पथकं सलामी देण्यासाठी येतात असं अविनाश जाधव यांनी सांगितलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.