ज्या दिवशी सत्ता नसेल त्या दिवशी… संजय राऊत यांचा गंभीर इशारा काय? ठाकरेंच्या सेनेत काय घडतंय?
Tv9 Marathi August 17, 2025 10:45 AM

नुकताच संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. शिंदेंना मंत्रिपदाची लॉटरी लागल्याचे विधान काल गणेश नाईक यांनी केले. त्यावर राऊत हे बोलताना दिसले. त्यांनी म्हटले की, लॉटरी हा प्रतिष्ठित शब्द आहे. एकेकाळी सरकार देखील लॉटरी चालवत होते. पण आता राज्यात बेकायदेशीरपणे मटका सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे जरी मुख्यमंत्री असले तरीही आकडा हा लावला जातोय. गणेश नाईक यांनी लॉटरी हा शब्द वापरला, त्यांनी ठाण्यात हे सूचक वक्तव्य केले आहे. पण त्यांच्या डोक्यात मटका हा शब्द असावा. मुख्यमंत्रिपदासाठी मटका लागला असावा, असे त्यांना म्हणायचे असावे. पण मटक्याचे आकडे चंचल असतात आणि चार चार मटके लोक चालवतात असेही राऊत म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, रतन खत्रीचा याचा त्याचा भगत असे मटके चालतात. मला याची माहिती असण्याचे प्रमुख कारण म्हणजे मी गुन्हेगारी क्षेत्रात एकेकाळी पत्रकारिता केली आहे. कारण भाजपाचे हे चंगू मंगू टंगू हे विचारतील. मटक्याची आकडे चंचल असतात, सकाळी वेगळा दुपारी वेगळा आणि रात्री वेगळा. हे आकडे सांभाळता येत नाही आणि यांच्या मटक्याचा आकडा काढणारा दिल्लीमध्ये बसला आहे. ते तिथे जाऊन आकडा लावण्याचा प्रयत्न करतात. पण सध्या यांचा आकडा लागत नाही.

हे सांभाळणे कठीण असते आणि जे दिसतंय त्यानुसार, त्यांना हे सांभाळता येत नाहीये आणि लवकरच यांचा आकडा अस्थंगत होईल. गणेश नाईकांनी मटका लावला नाही. मुळात म्हणजे गणेश नाईकांनी सुचक विधान केले असून त्यांनी ते ठाणे जिल्हात जाऊन केले आहे, याला महत्व आहे. जसं अमित शहा आणि त्यांच्या व्यापाऱ्यांचे टार्गेट आहे मुंबई हातात घ्यायची तसे मनसे आणि शिवसेनेचे टार्गेट आहे की, मुंबई ही गुजरातींच्या हाती जाऊद्याची नाही. ती मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे.

गिरीष महाजन यांच्याबद्दल बोलताना राऊतांनी म्हटले की, मुळात म्हणजेगिरीष महाजन हे महर्षी व्यास नाहीत. स्वत:च्या खाली काय जळतंय हे त्यांनी पाहवे. ज्यादिवशी त्यांच्याकडे सत्ता नसेल त्यादिवशी त्यांचे काय हाल असेल ते कुठे असतील याचा त्यांनी विचार करावा. उद्या ठाकरे बंधू हे राजकीय दुष्ट्या एकत्र झाल्यावर त्यांना कळेल. चोर दरोडेखोर हे जे फडणवीसांच्या भोवती आहेत, त्यांना सत्ता नसल्यावर रस्त्यावर फिरणे मुश्किल होईल, असे संजय राऊत म्हणाले आहेत. तुम्ही प्रमोद महाजन नाही तर जळगावचे गिरीष महाजन आहेत ते लक्षात घ्या आणि बघा आपले काय धंदे तुमचे आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.