फुलवडे, ता. १६ : फुलवडे (ता. आंबेगाव) येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभातफेरी, ध्वजवंदन व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजन केले होते. यावेळी गावातून विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय, भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो, वंदे मातरम अशा घोषणा देत हातात तिरंगा घेऊन प्रभातफेरी काढण्यात आली.
सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयात भारतमाता व क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन केले. सरपंच बबन मोहरे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदकरवाडी, श्रीरंग विष्णू गभाले विद्यालय, श्री नामदेवराव मारुती नंदकर अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहरेवाडी, भगतवाडी व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र याठिकाणी अनुक्रमे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ जंगले, दत्तात्रेय वाळुंज, स्वातंत्र्य सेनानी गोविंद उघडे, माजी मुख्याध्यापक गेणभाऊ उघडे, चिंतामण विठ्ठल भारमळ, जालिंदर नंदकर यांच्या हस्ते ध्वजवंदन केले. याप्रसंगी शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन केले होते.