गेवराई : मुलास भेटण्यास इंग्लंडमध्ये गेलेल्या गेवराईतील माजी मुख्याध्यापक यांनी भारताचा ७९ व स्वातंत्र्य दिन साजरा करत देशप्रेमातून एकात्मतेचा संदेश दिला आहे.'भारत माता की जय,स्वातंत्र्य दिनाचा विजय असो'च्या घोषणा दिल्या.
बीडमधील गेवराईच्या तलवाडा येथील गणपत नाटकर यांचा मुलगा हिंमत नाटकर हा इंग्लंडमध्ये असल्याने माजी मुख्याध्यापक नाटकर हे सपत्नीक मुलास भेटण्यास मागील आठवड्यात इंग्लंडमध्ये गेले आहेत.
परवा भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा वर्धापनदिन असल्याने त्यांनी थेट आपल्या मातृभूमीचा आदर राखत आपल्या कुटुंबियांसमवेत स्वातंत्र्य दिन ध्वजवंदन करून साजरा केला.
Siddheshwar Dam: मुसळधार पावसामुळे येलदरी भरले; सिद्धेश्वर धरणाचे आठ दरवाजे उघडून ६५०० क्युसेस विसर्गभारत माता की जय,भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो या घोषणा देत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.या त्यांच्या राष्ट्र प्रेमाबद्दल गेवराईचे माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार विजयसिंह पंडित यांनी शुभेच्छा देऊन त्यांच्या देशप्रेमा बद्दल तलवाडा ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.