आंबेठाण, ता. १७ : भांबोली (ता. खेड) येथे विविध कार्यक्रम सादर करून विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले.
यामध्ये ग्रामपंचायत निधीमधून करण्यात आलेल्या ग्रामपंचायत इमारतीचे नूतनीकरण, जिल्हा परिषद शाळेसाठी सांस्कृतिक भवन, नवीन घंटागाडी, औषध फवारणीसाठी गाडी, वंझीरा वस्ती आणि जिल्हा परिषद शाळेसाठी साउंड सिस्टम देण्यात आले.
त्याचप्रमाणे औषध फवारणी, तणनाशक फवारणी आणि घंटागाड्या वॉशिंग करण्यासाठी नवीन गाडीचा लोकार्पण सोहळा देखील यावेळी करण्यात आला. याप्रसंगी सरपंच शीतल काळूराम पिंजण, उपसरपंच अर्जुन राऊत, माजी उपसरपंच शरद निखाडे, माजी उपसरपंच अक्षदा राऊत, ग्रामपंचायत सदस्य कल्याणी राऊत, भागूबाई मेंगळे आदी उपस्थित होते.