Bhandara Crime: नोट लिहून युवतीने संपवले जीवन; नोटमध्ये छळणाऱ्यांची लिहिली नावे ,भंडारा जिल्ह्यातील घटना
esakal August 18, 2025 07:45 AM

लाखांदूर : मावस भावाकडून झालेला अत्याचार आणि मावशीच्या नातेवाइकांकडून मिळालेल्या धमकीमुळे त्रस्त झालेल्या एका युवतीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने छळणाऱ्या आरोपींची नावे सुसाइड नोटमध्ये लिहून तेच माझ्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १५) मोहरणा येथे घडली.

या प्रकरणी पोलिसांनी इटान येथील राजेश रमेश गजभिये, नंदा रमेश गजभिये, राहुल रमेश गजभिये, रमेश गजभिये व शालू ऊर्फ शीतल ओंढरे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मृत युवती ही गेल्या दोन वर्षांपासून इटान येथील उपरोक्त आरोपींसोबत राहत होती. यादरम्यान आरोपी राजेशने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचे सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे. ही बाब इतर आरोपी नातेवाइकांना कळल्यावर त्यांनी संगनमत करून तिला मारहाण केली तसेच प्रकरण बाहेर उघड न करण्यासाठी दबाव आणला.

Govindpur Accident: गडचिरोलीत भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; तीन जण गंभीर जखमी

दरम्यान, साधारण पंधरा दिवसांपूर्वी मृत युवती ही वडिलांच्या घरी परतली होती. मात्र, १५ ऑगस्ट रोजी तिने घरी कोणीही नसल्याची संधी साधून नाॅयलाॅन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. पंचनामा करताना मृत युवतीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत संबंधित आरोपींमुळेच आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. त्याच्या आधारावर मृत मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.