नाशिक: शहर-जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुंडाला सातपूरच्या खोका मार्केट परिसरातून अटक करण्यात आली. शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली.
समाधान ऊर्फ सॅम अशोक बोकड (वय २८, रा. तिरडशेत, पिंपळगाव बहुला, नाशिक) असे तडीपार गुंडाचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट दोनचे अंमलदार नितीन फुलमाळी यांना तडीपार गुंडाची खबर मिळाली होती.
Bhandara Crime: नोट लिहून युवतीने संपवले जीवन; नोटमध्ये छळणाऱ्यांची लिहिली नावे ,भंडारा जिल्ह्यातील घटनायुनिट दोनचे प्रभारी सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या सूचनेनुसार, उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, विलास गांगुर्डे, वाल्मीक चव्हाण, नितीन फुलमाळी, प्रवीण वानखेडे यांच्या पथकाने शनिवारी (ता. १६) दुपारी सॅम यास सातपूर खोका मार्केट परिसरातून सापळा रचून अटक केली. सॅमला दोन वर्षांसाठी शहर-जिल्ह्यातून तडीपार केले होते. या प्रकरणी सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.