Minister Ashish Shelar : १७ ऑगस्ट हा शिवचातुर्य दिन म्हणून साजरा केला जाणार: मंत्री आशिष शेलार; शासन सकारात्मक निर्णय घेणार
esakal August 18, 2025 05:45 AM

-प्रकाश शेलार

खुटबाव : १७ ऑगस्ट १६६६ या ऐतिहासिक दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यावरून सुटकेचा प्रारंभ झाला म्हणून हा दिवस ‘शिवचातुर्य दिन' म्हणून साजरा करण्याच्या भूमिकेत महाराष्ट्र शासन आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केले.आग्रा ( उत्तर प्रदेश) येथे शिवाजी महाराजांच्या सुटकेच्या ३५८ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून गरुड झेप मोहीम संस्थेच्या वतीने आग्रा ते रायगड अशा १३१० किमी पदयात्रा व सायकल रॅली अभियानाचा भव्य प्रारंभ पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर झाला.

Success Story: 'सातारच्या सोहम घोलपला गुगलमध्ये ४० लाखांचे पॅकेज'; कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी, संभाषणात्मक एआय सल्लागारपदी निवड

त्याप्रसंगी शेलार बोलत होते. यावेळी शेलार यांच्या हस्ते भगवा ध्वज दाखवत गरुड झेप मोहिमेचा प्रारंभ झाला. आमदार राहुल कुल म्हणाले की,१७ ऑगस्ट हा दिन शिवचातुर्य दिन म्हणून साजरा व्हावा म्हणून अनेकदा सभागृहात मागणी केली आहे. शासन याबाबत सकारात्मक निर्णय घेणार आहे. आपल्या महाराष्ट्रातील युवकगेली सहा वर्षापासून गरुड झेप मोहिमेचे आयोजन करतात ही आपल्यासाठी गौरवशाली बाब आहे.

यावेळी उत्तर प्रदेशचे उच्चशिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय, दौंड भाजप आमदार संजय उपाध्याय ,भाजप महिला मोर्चा राज्य उपाध्यक्षा कांचन कुल उपस्थित होते. कार्यक्रमाला संयोजक मारुती गोळे, अभय गोटे व अध्यक्ष राकेश विधाते, यांसह अनेक पदाधिकारी, स्वयंसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माेठी बातमी! '१५ ऑगस्टपासून चारचाकी वाहनांना टोल नाक्यांवर सूट मिळणार'; नेमकी काय योजना, वाहनधारकांना हाेणार फायदा

यावेळी १५० आंतरराष्ट्रीय महिला कलाकारांनी शिवगाथा नाटक तर सिंहगड येथील गोरे बुद्रुक जिल्हा परिषद शाळेच्या ५५ विद्यार्थिनींनी आग्र्याहून गरुड झेप नाटिका सादर केली. जामखेड येथील मल्लखांब प्रशिक्षण संस्थेच्या वतीने मर्दानी खेळ व योगा प्रात्यक्षिके घेण्यात आली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.