पिंपरी, ता. १७ ः निगडीतील श्री दुर्गेश्वर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वर्षभर विविध धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली जाते. या मंदिराचा सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी जीर्णोद्धार झाला. ट्रस्टने आतापर्यंत रक्तदान शिबिर, ज्येष्ठांसाठी योगासन वर्ग, कीर्तन महोत्सव असे उपक्रम राबविले आहेत. ट्रस्टचे अध्यक्ष गोविंद गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम होतात. ट्रस्टचे सचिव आनंदा साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदस्यांनी एकजूट, धार्मिक जागरूकता आणि सामाजिक जबाबदारी वाढवली आहे. सहसचिव बाळासाहेब धुमाळ, खजिनदार विकास सोनवणे, उपाध्यक्ष अमित गावडे आणि कैलास जायगुडे, प्रसिद्धी प्रमुख दिनेश लिंगावत यांच्या माध्यमातून श्रद्धा, सेवा आणि संस्कृती जोपासली जात आहे. साळुंखे म्हणाले, अध्यात्म म्हणजे अंतर्मुख होऊन आत्मशुद्धीचा प्रवास, तर समाजसेवा म्हणजे त्या शुद्ध आत्म्याने इतरांच्या जीवनात उजेड फुलवणे. जीवनातील खरी संपत्ती सेवा आणि श्रद्धेच्या मार्गावरच आहे.”
---