1 मुकेश खन्नाने रणबीर कपूरच्या ‘रामायणम्’ चित्रपटातील भूमिका नाकारली आहे.
2 ते म्हणाले की भीष्म पितामहसारखीच महत्त्वपूर्ण भूमिका त्यांना हवी आहे.
3 मुलाखतीत त्यांनी जया बच्चन आणि रणवीर सिंग यांच्यावरही कठोर शब्दांत टीका केली.
मुकेश खन्नाने रणबीर कपूरच्या ‘रामायणम्’ सिनेमात काम करण्यास नकार दिला होता. दरम्यान नुकतच त्यांनी एका मुलाखतीत त्याबद्दल कारण सांगितल आहे. ‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना नेहमीच त्यांचे मतं ही मांडत असतात. दरम्यान यावेळी त्यांनी जया बच्चन, रणबीर कपूर आणि रणवीर सिंह यांच्यावर थेट भाष्य केलय.
मुकेश खन्ना म्हणाले की, 'रामायणात मला भीष्म पितामहसारखीच मोठी आणि प्रभावी भूमिका हवी होती. आज जर मी इंद्र, सूर्य किंवा नारद मुनी करायला गेलो तर ते भीष्मनंतर डायरेक्ट डाऊनग्रेड होईल. मला दाढी लावणं, व्हिलन किंवा रोमँटिक रोल करणं मान्य नाही. जर लोकांना मुकेश खन्नाला घ्यायचं असेल तर अशाच मोठ्या भूमिकेत घ्या, नाहीतर मला काही रस नाही.' असं ते मुलाखतीत बोलताना म्हणाले.
रणवीर सिंगबद्दल म्हणताना ते म्हणाले, 'खूप लोक सांगतात हा नशेड़ी आहे, शक्तिमानसाठी याला घेऊ नका. कारण आमच्या लहानपणीच्या आठवणी खराब होतील.'
जया बच्चनबद्दल बोलताना मुकेश खन्ना म्हणाले, 'जयाजी आजकाल पापाराझींवर आणि राज्यसभेत ज्या पद्धतीने बोलतात, त्यावरून असं वाटतं की त्या कुठेतरी घरातल्या लोकांपासून दुरावल्या आहेत. अमिताभजींचं मी खूप कौतुक करतो, पण जया जी मोदींविरोधात मुद्दाम बोलत असल्यासारखं वाटतं. आधी देश त्यांना खूप आवडायचा, आता असं का?' असं ते म्हणाले.
FAQs
मुकेश खन्नाने ‘रामायण’मध्ये भूमिका स्वीकारली का?
नाही, त्यांना भीष्म पितामहसारखीच मोठी भूमिका हवी असून इतर पात्र नाकारले.
त्यांनी रणवीर सिंगबद्दल काय म्हटलं?
त्यांनी रणवीर सिंगला “नशेड़ी” संबोधलं आणि शक्तिमानसाठी योग्य नसल्याचं सांगितलं.
जया बच्चनबद्दल मुकेश खन्नांनी काय म्हटलं?
त्यांनी राज्यसभेतील वर्तन व पापाराझींवरच्या रागावर टीका केली आणि त्या घरातून दुरावल्यासारख्या वाटतात असं म्हटलं.
मुकेश खन्ना कोणत्या भूमिकांसाठी तयार आहेत?
केवळ भीष्म पितामहसारख्या प्रभावी आणि मोठ्या भूमिका करण्यास ते तयार आहेत.
तुला कसा नवरा हवाय? रिंकू राजगुरूने दिलेल्या उत्तरावर प्रार्थना बेहेरेने दिला सल्ला; म्हणते- तेव्हाच लग्न कर जेव्हा तू...