रशियातील एकातेरिनबर्ग येथील उरल फेडरल युनिव्हर्सिटीद्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय हॅकेथॉनमध्ये कोकणचा सुपुत्र पार्थ तोडणकर याने बाजी मारली आहे. 22 हून अधिक देशांनी सहभाग घेतलेल्या या तीव्र स्पर्धात्मक कार्यक्रमात पार्थने नावीन्यपूर्णता, समस्या सोडवणे आणि तंत्रज्ञानावर आधारित विचारसरणीमध्ये तेजस्वी कामगिरी करत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करताना विजय संपादन केला.
रशियात पार पडलेल्या हॅकेथॉन कार्यक्रमात विजय मिळवल्याबद्दल पार्थ आणि त्याच्या टीमचे सर्व स्तरातून काwतुक होत आहे. जगभरातील प्रतिभांमध्ये उभे राहून पार्थने दाखवलेली प्रतिभा म्हणजे हिंदुस्थानच्या तंत्रज्ञान समुदायासाठी एक तेजस्वी क्षण आहे. त्याने जागतिक व्यासपीठावर केलेली कामगिरी ही स्थानिक मुळांद्वारे जागतिक प्रभावावर विश्वास ठेवणाऱया प्रत्येक हिंदुस्थानीसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.