अमेरिका ही टॅरिफच्या मुद्द्यावरून दुटप्पी भूमिका घेत असतानाच डोनाल्ड ट्रम्प हे भारताबद्दल आग ओकत आहेत. त्यांनी पुतिन यांच्यासोबतच्या भेटीनंतरही भारताला धमकी दिली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील अमेरिकेच्या विरोधात मैदानात उतरल्याचे बघायला मिळतंय. त्यांनी थेट दिल्लीतील भाषणातून जगाला मोठा संदेश दिला आणि पुढील काळात भारताची रणनीती काय असणार हे देखील त्यांनी स्पष्ट केले. या काळात भारतीय लोकांना काय करायचे हे त्यांनी सांगितले. अत्यंत खास पद्धतीने भारतीय बाजारपेठेत मोठी कमाई करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांचे कंबरडे कसे मोडायचे याचा त्यांनी प्लॅन केलाय. यासोबतच चीनची जवळीक्ता देखील वाढली आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील काही वर्षांपासून युद्ध सुरू आहे. मात्र, अजूनही हे युद्ध संपले नाही. आता डोनाल्ड ट्रम्प हे संपूर्ण जगासमोर हे युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दाखवत आहेत. मात्र, त्यांना अजून यश आले नाही, यासंदर्भातील महत्वाची बैठक अमेरिकेत पार पडणार आहे. याच मुद्द्यावर 15 ऑगस्टला डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात भेट झाली. मुळात म्हणजे युक्रेन आणि रशियाचे युद्ध पेटवण्यामध्ये महत्वाची भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांची राहिली आहे.
जगासमोर असे मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे की, ट्रम्प हे युक्रेनची मदत करत आहेत. मात्र, अमेरिका नेहमीप्रमाणे येथेही दुहेरी रणनीती अवलंबत आहे. यापूर्वी अमेरिकेनेच युक्रेनला युद्ध लढण्यासाठी शस्त्रे दिली होती आणि आता ते म्हणत आहेत की युद्ध थांबवण्यासाठी अटी मान्य कराव्या लागतील. यामध्ये अमेरिकेची दुटप्पी भूमिका जगासमोर आली आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, जर युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की हे युद्ध थांबू इच्छित आहेत तर लगेचच थांबू शकतो.
यावेळी ट्रम्प यांनी पुढे स्पष्ट केली की, युद्ध थांबवण्यासाठी जेलेंस्की यांना काही अटी मान्य कराव्या लागतील. त्यांना क्रिमिया यासाठी सोडावे लागेल आणि रशियाच्या ताब्यात द्यावे लागेल. यासोबतच युक्रेन नाटोमध्ये सामील होणार नाही, असेही त्यांनी म्हटले. अमेरिकेला वाटले होते की, युक्रेनच्या युद्धानंतर रशिया त्यांच्यासमोर झुकेल. मात्र, तसे झाले नाही उलट युक्रेनसोबतही संबंध बिघडण्याच्या मार्गावर होती. आज या संदर्भात महत्वाची बैठक पार पडणार आहे.