Ahilyanagar Fire : अहिल्यानगरमध्ये मध्यरात्री भीषण आग, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
Saam TV August 18, 2025 08:45 PM
  • नेवासा फाटा येथे फर्निचर दुकानाला मध्यरात्री आग लागली.

  • या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

  • अग्निशामन दलाने आग नियंत्रणात आणली; मात्र तोपर्यंत मोठी हानी झाली.

  • आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस तपास सुरु आहे.

Horrific fire in Ahmednagar’s Nevasa: अहिल्यानगरमधील नेवासामध्ये आगीमध्ये होरपळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नेवासा येथील फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागली होती, त्यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. मध्यरात्री सर्वजण झोपेत असताना ही दुर्दैवी घटना घडली. फर्निचरच्या दुकानाला नेमकी आग कशामुळे लागली? याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशामन दल आणि पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. अग्निशामन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले, पण तोपर्यंत एकाच कुटुंबातील पाच जणांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला. (Ahilyanagar Nevasa blaze claims lives of entire family)

अहल्यानगर येथे नेवासा फाटा येथील फर्निचरच्या दुकानात मध्यरात्री एक वाजताच्या आसपास आग लागली. फर्निचर असल्याने आगीने रौद्ररूप घेतले. आग लागल्यानंतर धुराचे लोट मोठ्या प्रमाणात हवेत होते. या आगीमध्ये दुकानात असणारे पाच जणांचा होरपळून मृत्यू. एकच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर अहिल्यानगरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच राहातामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. दोन दिवसात दोन कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाल्यामुळे नेवासा आणि अहिल्यानगरवर शोककळा पसरली आहे.

BEST Election : ठाकरे बंधूंच्या युतीची लिटमस टेस्ट, भाजपविरोधात आज मैदानात, कोण जिंकणार निवडणूक?

नेवासाफाटा येथील मयूर फर्निचरला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला. मयूर अरूण रासने वय 45, पायल मयूर रासने वय 38, अंश मयूर रासने वय 10 वर्षे, चैतन्य मयूर रासने वय 7 वर्ष यासह एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. आगीत फर्निचरचे दुकान भस्मसात झाले. दुकानाच्या पुढच्या बाजूला राहणारे कुटूंबीय धुराने गुदमरले. पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू तर एकावर उपचार सुरू आहेत.

साताऱ्यात दहीहंडीचा जल्लोष! Udayanraje Bhosale यांनी उडवली हटके स्टाईल कॉलर, पाहा व्हिडीओ
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.