निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न नसेल तर तुमचं घरच तुमच्यासाठी ‘पेन्शन’ ठरू शकतं.
रिव्हर्स मॉर्गेज लोनमध्ये बँक तुमचं घर तारण घेते आणि तुम्हालाच दर महिन्याला ठराविक रक्कम देते.
घराचा ताबा आयुष्यभर तुमच्याकडे राहतो
Reverse Mortgage Loan: नोकरीनंतर जर पेन्शन नसेल, तर रोजचा खर्च भागवणे अवघड जाते. वयोमानानंतर निश्चित उत्पन्नाचा अभाव आणि मुलांकडून आर्थिक मदत न मिळाल्यास वृद्धापकाळ त्रासदायक ठरू शकतो. पण तुमचे स्वतःचे घरच तुमच्या म्हातारपणाची काठी होऊ शकते. तुमच्याकडे स्वतःचे घर असेल, तर बँकेच्या रिव्हर्स मॉर्गेज लोन योजनेतून तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम मिळू शकते.
काय आहे रिव्हर्स मॉर्गेज लोन?रिव्हर्स मॉर्गेज लोन ही एक खास योजना आहे. यात 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक आपले राहते घर बँकेकडे तारण ठेवून दर महिन्याला ठराविक रक्कम किंवा एकरकमी पैसे घेऊ शकतात. हे लोन इतर होम लोन किंवा पर्सनल लोनपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.
या लोनसाठी कर्जदाराला EMI भरावा लागत नाही.
बँक कधीही घरातून बाहेर काढत नाही. कर्जदार आयुष्यभर त्या घरात राहू शकतो.
फक्त कर्जदार आणि त्याच्या पत्नीच्या मृत्यूनंतरच बँक घरावर ताबा मिळवू शकतो.
फक्त 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक.
स्वतःच्या नावाचे राहते घर असणे आवश्यक.
बँक घराचे बाजारमूल्य पाहून 35% ते 55% इतकी रक्कम लोन स्वरूपात देते.
या लोनची कमाल मर्यादा 20 वर्षे आहे.
जर कर्जदार 20 वर्षांपेक्षा जास्त जगला, तर 20 वर्षांनंतर पैसे मिळणे थांबते, मात्र तो घरात राहू शकतो.
जीवनसाथी जिवंत असेल तर त्यालाही घरातून काढले जात नाही.
रिव्हर्स मॉर्गेज लोनचे व्याजदर सामान्य लोनपेक्षा जास्त असतात. सध्या बहुतेक बँका 9.40% ते 10.95% या दराने लोन देतात.
प्रत्येक पाच वर्षांनी घराचे नवे मूल्यांकन केले जाते. त्यानुसार व्याजदर आणि रक्कम बदलू शकते.
होय. कर्जदाराच्या मृत्यूनंतर घरावर बँकेचाताबा येतो आणि घर विकून बँक आपली रक्कम वसूल करते. पण वारसदार इच्छित असल्यास बँकेची मूळ रक्कम आणि व्याज परतफेड करून घर परत मिळवू शकतात. जर घर विक्रीतून आलेली रक्कम कर्जापेक्षा जास्त असेल, तर उरलेली रक्कम घरमालकाच्या वारसांना दिली जाते.
Mutual Fund: म्युच्युअल फंडमध्ये नुकसान होतयं? तुम्ही 'या' चुका करत आहात का?ज्येष्ठांना नियमित पेन्शन नसल्यास रिव्हर्स मॉर्गेज लोन मोठा दिलासा ठरू शकतो. स्वतःचे घर तारण ठेवूनही आयुष्यभर त्या घरात राहता येते आणि दरमहा ठराविक उत्पन्न मिळते. त्यामुळे हा लोन प्रकार आर्थिकसुरक्षिततेसाठी महत्त्वाचा पर्याय ठरत आहे.
FAQsQ1: रिव्हर्स मॉर्गेज लोन कोण घेऊ शकतो?
- 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, ज्यांच्याकडे स्वतःचं घर आहे.
Q2: लोन घेतल्यानंतर घर सोडावं लागेल का?
- नाही. कर्जदार आणि त्याचा जोडीदार आयुष्यभर घरात राहू शकतात.
Q3: लोन किती वर्षांसाठी मिळतं?
- साधारणपणे 20 वर्षांसाठी.
Q4: कर्जदाराच्या मृत्यूनंतर घराचं काय होतं?
- बँक घर विकून मूळ रक्कम वसूल करते, पण वारस परतफेड करून घर परत मिळवू शकतात.