Maharashtra Politics Live Updates : राजनाथ सिंह यांचा मल्लिकार्जुन खर्गे यांना फोन
Sarkarnama August 18, 2025 08:45 PM
Nanded live: मुक्रमाबाद गावात पुराच्या पाण्यात बुडून 50 म्हशी दगावल्या

मराठवाड्यातील मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद गावात पुर आला आहे. पुराच्या पाण्यात बुडून 50 म्हशी दगावल्या असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे पशु पालकांचं मोठं नुकसान झालं आहे. अजूनही मेलेल्या म्हशी या पाण्यातच आहेत. मूक्रमाबाद गावात सध्या पुरजन्य परिस्थिती असून सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

गणेश नाईकांचा जनता दरबार

पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भरणार आहे. नवी मुंबईत सोमवारी, 20 ऑगस्ट रोजी जव्हार आणि ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये 22 ऑगस्ट रोजी जनता दरबार होणार आहे.

Vice President News: इंडिया आघाडीच्या उमेदवार कोण?

उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएने सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केली आहे. एनडीए उमेदवारासाठी विरोधकांचा पाठिंबा मिळावा यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना फोन केला आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएतर्फे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या देखरेखीखाली होणार आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची निवडणूक प्रतिनिधी (एजंट) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

संजय शिरसाट यांच्याकडून पाच हजार कोटीचा घोटाळा - रोहित पवार

संजय शिरसाट यांनी तब्बल पाच हजार कोटीची चार हजार एकर जमीन ते सिडकोचे अध्यक्ष असताना बिलवकर या कुटुंबाला दिली. ही एकप्रकारे भूमिपुत्रांच्या बाबतीतही गद्दारीच आहे. त्यामुळं बेकायदा पद्धतीने बिवलकर कुटुंबाला दिलेल्या या जमिनीसह राज्यातील अशा प्रकारच्या सर्वच जमिनी सरकारने परत घ्याव्यात आणि मंत्री संजय शिरसाठ यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

इंडिया आघाडीचा उमेदवार आज ठरणार

उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएने सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केली आहे. इंडिया आघाडीकडून उमेदवार कोण असणार हे ठरवण्यासाठी आज इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

शिवसेनेचे लाडकी सून अभियान

आपल्या घरात जशी आपली लेक लाडकी असते तशीच सूनही लाडकी असायला हवी. तिला योग्य वागणूक देऊन सन्मानाने वागवायला हवे, आणि जे असे करणार नाहीत त्यांना आता शिवसेना महिला आघाडी योग्य पद्धतीने धडा शिकवणार आहे, असा इशारा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'लाडक्या सुनेचे रक्षण हेच शिवसेनेचे वचन' हे अभियान हाती घेणार असल्याचे जाहीर केले.

सीसीटिव्हीवर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण हास्यास्पद -आव्हाड

सीसीटिव्हीवर लावण्यावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण हास्यास्पद आहे.माझा मुख्य निवडणूक आयुक्तांना एक प्रश्न आहे, जर CCTV चे फुटेज सार्वजनिक करण्यास आपल्याला महिलांची प्रायव्हसी आडवी येत असेल तर,ते निवडणुकीच्या दिवशी घेताना तुम्ही त्या तमाम महिलांची परवानगी घेतली होती का..?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

मराठा आरक्षणसाठी टोकाची भूमिका नको - गोपीचंद पडळकर

मराठा आरक्षणासंदर्भात टोकाची भूमिका घेऊ नये, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सरकारने संवेदनशीलतेने 10 टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या, त्यांना कुणबी दाखले मिळाले आहेत. यापलीकडे टोकाची भूमिका मराठा समाजाच्या हिताची नाही.

Car Accident : संभाजीनगरमधील भीषण अपघात, मद्यधुंद कारचालकाने 6 जणांना उडवले

संभाजीनगरमध्ये रविवारी रात्री भीषण अपघात झाला. मद्यधुंद कारचालकाने 6 जणांना उडवले. या अपघातामध्ये एक महिला आणि मुलगी गंभीर जखमी आहेत. नागरिकांनी कारचालाकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. कारचालकाचे नाव संकेत अंबोरे असे आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.