सोन्याचे भाव सध्या गगनाला भिडलेत. 1 तोळा सोन्यासाठी लाखभरापेक्षा जास्त पैसे मोजावे लागतायच तरीही सोन्याचे दागिने घालणं हे अनेकांना आवडतं, त्यामुळे भाव वाढूनही खरेदी सुरू असते. सोन्याचे दागिने घालणं हे सोशल स्टेटस आहे आजही, विशेषत: महिलांसाठी.. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, उत्सव किंवा कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात त्या हे जागिने उत्साहाने घालतात. मात्र हे दागिने खरेदी करताना, ते खरे आहेत की बनावट हे ओळखणे महत्त्वाचे आहे.
कारण 1 ग्रॅम भेसळदेखील हजारो रुपयांचे नुकसान करू शकते. अशा परिस्थितीत प्रत्येकाने सावधगिरी बाळगली पाहिजे. जर तुमच्याकडे सोन्या-चांदीचे दागिने असतील आणि तुम्हाला ते खरे आहे की बनावट हे तपासायचे असेल तर तुम्ही ते घरी बसूनही ओळखू शकता.
खरं सोने आणि चांदी ओळखण्याचा सर्वात सोपा आणि सोपा मार्ग म्हणजे हॉलमार्क तपासणे, सोने आणि चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्कला खूप महत्त्व आहे. हे हॉलमार्क तुम्हाला कोणत्याही दागिन्यांवर किंवा भांड्यांवर दिसेल. जर हॉलमार्क नसेल तर ते दागिने बनावट असू शकतात. हॉलमार्क पाहण्यासाठी त्यावर लहान संख्या किंवा अक्षरे असू शकतात, जी काळजीपूर्वक तपासावी लागतील.
तसेच आपल्या रेफ्रिजरेटरमध्ये म्हणजेच फ्रीजमध्ये ठेवलेला बर्फाचा तुकडा देखील खरी चांदी ओळखण्यास मदत करू शकतो. कारण, चांदी इतर धातूंच्या तुलनेत जास्त उष्ण असते. जर तुम्ही कोणत्याही चांदीच्या दागिन्यांवर किंवा भांड्यावर बर्फाचा तुकडा ठेवला आणि तो लवकर वितळला तर समजून जा की ती चांदी खरी आहे.
सोने किंवा चांदीचे दागिने खरे आहेत की बनावट हे ओळखण्याचा आणखी एक सोपा मार्ग म्हणजे चुंबक. कारण चुंबक कधीही चांदी आणि सोने स्वतःकडे आकर्षित करत नाही, परंतु त्यात काही अशुद्धता असेल आणि जर तुम्ही ते दागिने चुंबकाजवळ ठेवले तेव्हा ते स्वतःकडे आकर्षित करते, खेचून घेते. त्यामुळे तो मला कसा असेल हे समजू शकतं. चुंबकाने ते दागिने खेचून घेतले नाही म्हणजे ते दागिने खरे असू शकतात.
सोनं खरं की खोटं हे जर तुम्हाला घरी तपासायचं असेल तर एका मोठ्या भांड्यात पाणी भरा आणि त्यात दागिने घाला. जर दागिने पाण्यात बुडले तर ते खरं सोनं आहे. खरे सोनं कितीही हलकं असलं तरी ते पाण्यात बुडतं.
सणा-सुदीच्या काळात चांदीची नाणी खूप लोकप्रिय असतात, त्यांना खूप मागणी असते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला नाण्यातील चांदीचे प्रमाण तपासायचे असेल, तर ते जमिनीवर टाका आणि नाणे घंटेसारखा आवाज करते का ते पहा, तर तेी खरी चांदी आहे.
सोने आणि चांदीचे दागिने खूप महाग असतात, म्हणून जेव्हाही तुम्ही दागिने खरेदी कराल तेव्हा नेहमीच पावती किंवा योग्य बिल घेतलं पाहिजे. यामुळे तुम्हाला दागिने खरेदी केल्याची अधिकृत नोंद मिळेल. जर विक्रेत्याने तुमची फसवणूक केली असेल तर तुम्ही कायदेशीर कारवाई देखील करू शकता. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)