छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी गेल्या काही वर्षांत नवीन घरात प्रवेश केला. त्यात प्राजक्ता माळी, विजय आंदळकर, सई ताम्हणकर, ऋतुजा बागवे, केतकी माटेगावकर, विवेक सांगळे यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. तर काही कलाकारांनी शहरांच्या बाहेर जागा घेत आपलं टुमदार असं फार्महाउस देखील बांधलंय. आता या यादीत आणखी एका अभिनेत्याचा समावेश झालाय. 'जय मल्हार' मालिकेतील खंडोबा म्हणजेच अभिनेता देवदत्त नागे याने खंडोबाच्या नगरीत स्वतःचं घर बांधायचं ठरवलं आहे.
‘जय मल्हार’ ही मालिका झी मराठीवर लोकप्रिय ठरली होती. या मालिकेतून खंडेरायाची भूमिका साकारत अभिनेता देवदत्त नागे घराघरात पोहोचला. मालिकेच्या समाप्तीला अनेक वर्षे झाली असली तरी, देवदत्तच्या खंडेरायाच्या प्रतिमेचं वेगळं स्थान प्रेक्षकांच्या मनात अजूनही ताजं आहे. अलीकडेच देवदत्त नागेने आपल्या चाहत्यांना एक खास आनंदाची बातमी सांगितली आहे. देवदत्त आता जेजुरीत स्वतःचं घर बांधत आहे. जेजुरीच्या पायथ्याशी जमिनीचा तुकडा विकत घेतल्याची माहिती त्याने सोशल मीडियावरील पोस्टमधून दिली. या ठिकाणावरून थेट खंडेरायाच्या गडाचं दर्शन होणार आहे, हेच त्याच्या घराचं वेगळं वैशिष्ट्य ठरणार आहे.
View this post on InstagramA post shared by Devdatta Gajanan Nage (@devdatta.g.nage)
देवदत्तने बहिणीच्या हस्ते भूमिपूजन करून घरबांधणीला सुरुवात केली. यानिमित्ताने झालेल्या गोंधळ जागरणाचा आनंद तो चाहत्यांसोबत शेअर करताना म्हणाला की, “श्री खंडेरायांच्या कृपेने त्यांच्या सान्निध्यात घर बांधण्याचं भाग्य लाभलं. आता त्यांच्या चरणी सेवा करण्याची संधी मिळणार आहे.” त्याच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेकांनी ‘जय मल्हार’ मालिकेतील आठवणींना उजाळा देत देवदत्तला घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. खंडेरायाच्या नगरीत नवं घर उभारताना देवदत्त नागे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भावविश्वाशी जोडला गेला, हे मात्र नक्की.
मराठी लोकांचा वरण भात म्हणजे गरीब शेतकऱ्यांचं जेवण... विवेक अग्निहोत्रीच्या वक्तव्यावर भडकले नेटकरी; म्हणतात- या गाढवाला...