अशा पुरुषांवर जीव ओवाळून टाकतात महिला, तुमच्यात आहे का तो गुण?
Tv9 Marathi August 19, 2025 09:45 PM

आकर्षणाचे विज्ञान काय आहे. ते कसे काम करते यावर संशोधन सुरू आहे. जगभरातील अनेक विद्यापीठात त्यावर काथ्याकुट सुरू आहे. दुसरीकडे लॉ ऑफ अट्रॅक्शनवर तर अनेक पुस्तकं, चित्रपट निघाली आहेत. पण स्त्रीयांना कसे पुरूष भावतात. त्या त्यांच्यावर कशा भाळतात. त्यांना कोणते पुरूष आवडतात यावर संशोधन सुरू आहे. अर्थात त्याचे उत्तर काही एका ओळीतील नाही. महिलांच्या मनात काय सुरू असते हे ब्रह्मदेवाला ही माहिती पडत नाही असं मिश्किलपणे म्हटलं जातं. पण असे पुरूष महिलांना आवडतात. त्या त्यांच्याकडे आकर्षीत होतात. कोणत्या आहेत त्या खास गोष्टी?

अनेकदा स्त्रीया पहिल्याच भेटीत पुरूषाच्या प्रेमात पडतात. पण त्या पुरुषावर लागलीच विश्वास ठेवत नाहीत. त्या त्याला समजून आणि उमजून घेतात. त्या चटकन निर्णय घेण्यावर विश्वास ठेवत नाहीत. शास्त्रज्ञ त्याविषयीचे संशोधन करत आहेत. पण अशा कोणत्या बाबी अथवा गोष्टी आहेत की त्या स्त्रीयांच्या मनात सुरू असतात, याविषयी शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत.

रूटर विद्यापीठातील मानववंश शास्त्रज्ञ आणि प्रसिद्ध लेखिका हेलेन ई. फिशर यांच्या मते, जगभरातील महिलांच्या अभिव्यक्तीनुसार त्यांना कोणता पुरूष आवडतो, यात भेद आहेच. पण एक सामान्य गोष्ट अशी आहे की, जबरदस्ती, मत लादणारे पुरूष महिलांना फार काही आवडत नाही. त्यांना असा पुरुष हवा असतो की जो त्यांना समजून घेईल. त्यांचा विचार ऐकेल. त्यांच्या मतांचा सन्मान करेल. त्यांना बाजू मांडण्याची संधी देईल.

2010 मधील एका संशोधनानुसार, 3,770 लोकांचा अभ्यास करण्यात आले. त्यांच्या वयात अंतर होते. त्यात महिला या त्यांच्यापेक्षा अधिक वयाच्या पुरुषाकडे आकर्षित होतात हे स्पष्ट झाले. तर डंडी विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ फियोना मूर यांच्या मते, ज्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, त्या मोठ्या वयाचे आणि प्रभाव असलेल्या पुरुषांच्या प्रेमात पडल्याचे समोर आले. वयाने मोठा असलेला पुरूष हा अनुभवी असल्याचा एक प्रभाव मानसिकदृष्ट्या असतो. त्यामुळे अशा पुरुषांना त्या अधिक पसंती देतात.

तर न्यू साऊथ वेल्स विद्यापीठातील संशोधनानुसार, थोडी दाढी असलेला पुरूष काही महिलांना आकर्षित करतो. सर्वच महिलांना दाढी आवडते असा त्याचा अर्थ नाही. स्टाइलिश दाढी असलेला पुरूषही काही महिलांना आकर्षित करतो. पण अनेक संशोधनानुसार, समजूतदार, मनमोकळा आणि प्रेम करणारा पुरूष हा महिलांचा ऑलटाईम फेव्हरेट राहिला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.