मोई शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
esakal August 20, 2025 12:45 PM

कुरुळी, ता. १९ : मोई (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व हस्तांतरण सोहळा पार पडला. येथील शाळेला अल्ट्रा कार्पोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या सीएसआर निधीतून वर्ग खोल्या, संगणक कक्षा, अंगणवाडी, शौचालय, क्रीडांगण सुशोभीकरण करण्यात आले.
आमदार बाबाजी काळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘‘यापुढील कोणत्याही अडचणी असो, शैक्षणिक व इतर सर्व लोक विकास कामांसाठी शासन पातळीवर सर्वतोपरी मदत करण्यास मी सदैव तत्पर राहील. तसेच चिखली - मोई - निघोजे रस्ता चारपदरी काम होणार होईल.’’
यावेळी खेड आळंदी विधानसभेचे आमदार बाबाजी काळे, अल्ट्रा कार्पोटेकचे अधिकारी यश भोसले, प्रमोद भोसले, गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले ,चाकण बीटचे विस्ताराधिकारी टिळेकर, कुरुळी केंद्राचे केंद्र प्रमुख कुसाळकर, सरपंच शीलाताई रोकडे, उपसरपंच सोमनाथ गवारी, माजी उपसरपंच संतोष येळवंडे, संग्राम पाटील, आरती फलके, सारिका करपे, गोरख गवारी, ग्रामअधिकारी एस. कड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा नेत्र गवारी उपाध्यक्ष आदी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.