Sanjay Raut : ‘शिंदे दिवसभर फिरत होते, आदित्य ठाकरे मात्र…’, पत्रकाराच्या डिवचाणाऱ्या त्या प्रश्नावर राऊतांच उत्तर काय?
GH News August 20, 2025 02:14 PM

“राधाकृष्णन ते राज्यपाल आहेत, ठीक आहे. ते झारखंडचे राज्यपाल असताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजभवनात ईडीने अटक केली. संविधानाची कोणती मुल्य पाळली नाहीत. संविधानाचे प्रमुख म्हणून बसलेल्या राधाकृष्णन यांनी राजभवनात अशा प्रकराच कृत्य करणं घटनाबाह्य आहे हे ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं नाही. हे सुद्धा तितकच महत्वाच आहे. त्यामुळे आमची लढाई अशा प्रकारची हुकूमशाही प्रवृत्ती, त्याच समर्थन करणाऱ्या संवैधानिक पदावनरील व्यक्ती विरुद्ध आहे. आमचा आकडा नगण्या नाही” असं संजय राऊत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबद्दल बोलले.

“जर एखाद्याला अटक केली मुख्यमंत्री, मंत्री पदावर असताना तर त्याला 30 दिवसात राजीनामा द्यावा लागतो. हा जो कायदा आहे तो विरोधी पक्षाच्या सरकारांवर दहशत निर्माण करण्यासाठी आणलेला कायदा आहे. तुमच्या सरकारचे मुख्यमंत्री धुतल्या तांदळासारखे आहेत का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. “महाराष्ट्रातले मंत्री, आधीचे मुख्यमंत्री ते रोज तुरुंगातच गेले पाहिजेत. अमित शाह, संजय शिरसाट, संजय राठोड, गिरीश महाजन असे मंत्री आहेत, त्यांच्यावर कारवाई करुन बर्खास्त करणार आहेत का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. “हा कायदा आणला आहे, विरोधी पक्षाच्या सरकारमधले मंत्री, मुख्यमंत्र्यांना घाबरवण्यासाठी” असं संजय राऊत म्हणाले.

‘हे हुकूमशाहीच शेवटच शिखर’

“राहुल गांधी यांनी मतचोरी संदर्भात निवडणूक आयोगाविरोधात जो वणवा पेटवला आहे. त्यामुळे यापुढे त्यांना मतचोरी करुन निवडणुका जिंकता येणार नाहीत. अशा परिस्थितीत राज्यात विरोधी पक्षांची सरकारं येतील. ती सरकारं पक्षातर करुन भाजपात आणता यावीत, म्हणून हा कायदा आणला जात आहे. हे हुकूमशाहीच शेवटच शिखर आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

‘साधनसुचिता, नैतिकता रहावी म्हणून कायदा आणतोय’

“पंतप्रधानांवर देश लुटल्याचा आरोप आहे. आपल्या लाडक्या मित्राला त्यांनी देश लुटून दिला आहे. त्यावर गुन्हा दाखल करा. या कायद्याच्या बकवास गोष्टी आम्हाला सांगू नये. कायदा आणताना भाषा काय आहे, राजकारणात साधनसुचिता, नैतिकता रहावी म्हणून कायदा आणतोय. गेल्या दहावर्षात साधनसुचिता, नैतिकता या लोकांनी ठेवलीय का? हे मोदी, शाह, देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं” असं संजय राऊत म्हणाले.

50 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

“ज्या महाराष्ट्र सरकारमध्ये संजय शिरसाट, एकनाथ शिंदे मंत्री आहेत ते कोणत्या नैतिकतेच्या गोष्टी करतात. काल 50 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप पुरव्यासह केला. अमित शाह यांना मी स्वत: त्यांची कागदपत्र दिली आहेत” असं राऊत म्हणाले.

‘तुम्हाला काय माहित, तुम्ही इथे बसून बोलताय’

एकनाथ शिंदे काल दिवसभर मुंबई, ठाणे परिसरात पाहणी करत फिरत होते, आदित्य ठाकरे मात्र, वरळीच्या बाहेर गेले नाहीत असा प्रश्न एका पत्राकारने विचारला. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “तुम्हाला काय माहित, तुम्ही इथे बसून बोलताय. काल अख्खी शिवसेना रस्त्यावर होती. ठाकरे म्हणजे शिवसेना. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे मुंबईसह महाराष्ट्रात शिवसैनिकांना मदतीला उतरवण्यासाठी यंत्रणा राबवत होते. वरळी हा त्यांचा मतदारसंघ आहे. आपल्या मतदारसंघात जाऊन लोकांची काळजी घेणं, ही त्यांची जबाबदारी आहे”

‘सरकार ठाकरेंच आहे का?’

“सगळ्यात आधी जबाबदारी नगरविकास मंत्र्यांची आहे. या सगळ्या प्रकरणात नगरविकास मंत्रालयाला फासावर लटकवलं पाहिजे. सरकार कोणाच आहे? सरकार ठाकरेंच आहे का? सरकार शिंदे, फडणवीस, पवारांच आहे” असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.