सोन्याचे दर अद्यतन नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय पातळीवर रशिया यूक्रेन यांच्यातील युद्ध चर्चेच्या माध्यमातून थांबवण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरु आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्का येथे भेट झाल्याचे परिणाम जगभरातील बाजारावर दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणाव कमी होत असल्यानं गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा भांडवली बाजारात गुंतवणुकीला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळं सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं दिसून येत आहे. चांदीचे दर आज 2400 रुपयांनी घसरले आहेत. तर, सोन्याच्या दरात 365 रुपयांची घसरण झाली आहे. 8 ऑगस्टला सोन्याच्या दरानं उच्चांक गाठला होता, 24 कॅरेट सोन्याचा दर त्यावेळी 101406 रुपयांवर होता, त्यानंतर सोनं 2603 रुपयांनी कमी झालं आहे. सर्राफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 101767 रुपये एक तोळा इतका आहे.
24 कॅरेट सोन्याचे दर 365 रुपयांनी कमी झाले आहेत. तर, चांदीचे दर 2400 रुपयांनी कमी होऊन 111225 रुपये किलोवर आले आहेत. जीएसटीसह एक किलो चांदीचा दर 114561 रुपये इतका आहे. आयबीजेएच्या दरांनुसार चांदीचा जीएसटीशिवायचा दर 113625 रुपये आहे. तर, 24 कॅरेटचा एका तोळ्याचा दर 99168 रुपये इतका आहे.
23 कॅरेट सोनं देखील 365 रुपयांनी कमी होऊन 98407 रुपयांवर आलं आहे. जीएसटीसह याचा एका तोळ्याचा 101359 रुपये आहे. हा दर मेकिंग चार्जेश शिवाय आहे. 22 कॅरेट सोन्याच्या एका तोळ्याच्या दरात 334 रुपयांची घसरण होऊन ते 90504 रुपयांवर आलं. जीएसटीसह हा दर 93219 रुपये आहेत. 18 कॅरेट सोन्याच्या एका तोळ्याच्या दरात 274 रुपयांची घसरण होऊन किंमत 74102 रुपये झाली.
मुंबईबंगळुरु, पुणेहैदराबाद आणि चेन्नई या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 91800 रुपये आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा दर 100150 रुपये इतका आहे. तर, नवी दिल्ली आणि लखनौमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 91950 रुपये आहे, तर 24 कॅरे सोन्याचा दर 100300 रुपये इतका आहे.
अहमदाबाद आणि इंदोरमधील 22 कॅरेट सोन्याचा दर 91850 रुपये इतका आहे. तर ,24 कॅरेट सोन्याचा दर 10020 रुपये एक तोळा इतका आहे. सोन्याची मागणी घटल्यानं देशभरात दरात घसरण झाली आहे. कोलकाता येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 91800 रुपये एक तोळा तर 24 कॅरेट सोन्याचा दर 100150 रुपये आहे.
सर्राफा बाजारात 2025 मध्ये सोन्याच्या दरात 23063 रुपयांची दर चांदीच्या दरात 25208 रुपयांची वाढ झाली. 31 डिसेंबर 2024 ला सोन्याचा एका तोळ्याचा दर 75740 रुपये तर चांदीचा दर 86017 रुपये किलो होता.
आणखी वाचा